वाशी येथे आमदार चषकाचा मानकरी ठरला स्वयंभू भातसई संघ! 

जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेच्या नियोजनाचे अनिकेत तटकरें कडून  कौतुक!

कोलाड नाका  (शरद जाधव) रोहा तालुक्यातील वाशी येथे आयोजित जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेत स्वयंभू भातसई हा संघ आमदार चषकाचा मानकरी ठरला.तर दर्यावर्दी बंदर नागाव याना उपविजेतेपदावर समाधान मानावे लगले.

             रोहा तालुक्यात पहिल्यांदाच अनिकेत तटकरे यांच्या नावाने गणेश मंडळ व जय भवानी क्रिडा मंडळ वाशी यानी आमदार चषक स्पर्धा भरविल्या होत्या.कबड्डी स्पर्धेचे उध्घाटन खासदार सुनीत तटकरे यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी उपस्थित कबड्डीपटूना खासदार सुनिल तटकरे यानी शुभेच्छा दिल्या.

        व्यासपिठावर कार्याध्यक्ष मधुकर पाटिल जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, तालुकाध्यक्ष विनोद पासिळकर, शंकर भगत अनंत मगर  अनिल भगत,यशवंत रटाटे, सतिश भगत, महेश बामूगडे नवनीत डोलकर, उत्तम नाईक , रामचंद्र सकपाळ,आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत जिल्ह्यातून 32 संघांनी भाग घेतला होता. प्रतेक लढती या चुरशीच्या झाल्या. पहिल्यांदाच या वर्षी कब्बडी प्रेक्षकांना बहारदार खेळ पहावयास मिळाले.रायगड जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस सुरेश मगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच अरविंद मगर व त्यांच्या सह्कारी यानी दमदार आमदार अनिकेत तटकरे यांच्या नावाने सामने भरवील्याने  स्पर्धेचे नियोजन हे डोळ्यांचे पारणे  फिटनारे ठरले. कार्यक्रम ठिकानी आमदार अनिकेत तटकरे यांचे भव्य दिव्य होर्डीग्स लावण्यात आले होते. त्यामूळे कब्बडी च्या मैदानात राष्ट्रवादीचा बोलबाला असेच चित्र दिसत होते.

    रात्री 11 वाजता आमदार अनिकेत तटकरे यानी स्पर्धेच्या ठिकानी उपस्थिती  दाखवली यावेळी फटाक्यंच्या अतीषबाजीत आमदारांचे स्वागत करण्यात आले.यावेळी विचार वेक्त करताना आमदार अनिकेत तटकरे यानी या कब्बडी स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडूना पुढे जाण्याची संधी मिळेल. अरविंद व त्याच्या सहकारी यानी देखणे नियोजन केले . राजकिय नियोजन किवा कुठलाही कार्यक्रम असो वाशी कर कुठेही कमी पडत नाही हे त्यानी आज दाखवुन दिले आहे. गेली 10 ते 15 वर्ष कब्बडी क्षेत्रात रोहा तालुक्याचे नाव झळकत आहे.कुमार गट स्पर्धेत, राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडू चमकत आहेत. भविष्यात येथील खेळाडु यानी राज्यपातळीवर चमक दाखवावी.याकरिता सर्व सहकार्य राहील असे आमदार अनिकेत तटकरे यानी खेळाडुना मार्गदर्शन केले.

या वेळी व्यासपिठावर सुरेश मगर, अनंत मगर राकेश शिंदे, संजय मांडलूस्कर, गणेश वाचकावडे, जग्गनाथ धनावडे, महेश बामूगडे,रुपेश बामूगडे,निवास खरिवले, मुकेश भोकटे, जनार्दन मोरे,अजित अंब्रुसकर, दिपक जमदाडे. दिनेश भगत आदी मान्यवर उपस्थित होते .

                 सदर स्पर्धेत स्थनिक संघांनी सुधा चमकदार कामगिरी केली.परंतु सर्वाचे आकर्षण ठरला  लांढ़र संघ यानी अनेक बलाढ़य संघासमोर चुरशीची लढत देत विजय संपादन केले.मत्र मार्गदर्शन व नियोजन कमी पडल्याने अंतीम ध्येय गाठण्याचे प्रयत्न फोल ठरले सामने हे रात्रो पहाटे 4 वाजेपर्यंत चालू होते. त्या वेळेपर्यन्त कबड्डी रसिकांनी तुडूंब गर्दी केली होती.

     स्वयंभू भातसई संघाचा धीरज खरिवले,अष्टविनायक कोलवे संघाचा राहुल कोळी, दर्यावर्दी नागाव बंदर चा मिथुन भोईर,कासु संघाचा प्रेषित बोरकर.भातसई संघाचा आशिष मोरे यांच्या आकर्षक चढाईचा कब्बडी रसिकानी मनमुराद आनंद लूटला. 

  स्पर्धेत तृतीय क्रमाकाचा मानकरी ठरला श्री गणेश कासु  अणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला नवकिरण भेंडखळ.  मालीकावीर  धीरज खरिवले.भातसई, उत्कृस्ट चढाई मिथुन भोईर नागाव, उत्कृस्ट पकड अमित ठाकुर भेंडखळ,  पब्लीक हिरो  प्रेषित बोरकर कासु, उत्कृष्ट मध्यरक्षक आशीष मोरे भातसई, उत्कृष्ट  कोपरा रक्षक अंकेत खोत नागाव उत्कृष्ट  बोनसपटू आकाश पाटिल कोपरपाडा, शिस्तबद्ध खेळाडु राहूल कोळी यांस सन्मानित करण्यात आले. 

  समालोचन रुपेश डाकी  व भाई पेटकर यानी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री गणेश मंडळ व जय भवानी मंडळ वाशी  व ग्रामस्थ यानी अथक मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog