मुंबई-गोवा हायवे वरील सावली हरपली, उष्णतेचा पारा ४२ अंशा पर्यंत
गोवे- कोलाड (विश्वास निकम) मुंबई-गोवा महामार्ग हा वाहतुकीच्या व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महामार्ग असून या महामार्गाच्या दुतर्फे लहान मोठी वृक्ष मोठया प्रमाणात होती. ती या महामार्गाच्या चौपदरी करणात पूर्णपणे तोडण्यात आली. यामुळे प्रवाश्यांसह, शेतकरी, वाटसरू यांना सावलीचा मोठा आधार होता व कोकणात येणाऱ्या वाहणांना ही देखील क्षणभर ही वृक्षवल्ली उपयुक्त ठरत होती परंतु सद्यास्थितीत तापमानाचा पारा ही ४२ अंशाच्या वर चढला असून सावलीचा आधार असणारी झाडे पूर्णपणे चौपादरीकरणात नष्ट झाली असल्यामुळे या महामार्गावरील सावली हरपल्याचे चित्र दिसून येत आहे.
दिवसेंदिवस तापमानात मोठया प्रमाणात वाढ होत असून सर्वत्र उष्म्याने कहर केला असून सकाळी दहा नंतर कोणीही बाहेर पडत नसल्याने रस्ते ही ओस पडले ब आहेत.या गर्मीमुळे काही प्रमाणात असणारी झाडे-जुडपे, पशु पक्षी, मनुष्य उन्हाच्या काहीलीने तळपून निघत निघत असून जनवारे, वन्यजीव, प्राणी सावलीच्या शोधात दिसत आहेत. त्यात प्रचंड लावण्यात येणाऱ्या वणव्यांमुळे थोडया प्रमाणात असणाऱ्या झाडांची पाने गळून पडल्यामुळे प्रवाश्यांना मिळणारी सावलीचा आधार मिळत नाही.
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" फक्त कागदावरच!
एके काळी कोकणात सुट्टीसाठी येणाऱ्या लहान मुलांच्या वठावर झुक-झुक अगीनगाडी गाडी, पळती झाडे पाहू या मामाच्या गावाला जाऊ या वृक्ष तोडीमुळे या गाण्याचा विसर पडला आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणात बारा वर्षापूर्वी लाखो वृक्षाची कत्तल करण्यात आली परंतु त्यांच्या जागी नवीन झाडे ही लावली गेली नाही यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडांची लागवड करावी. यामुळे या महामार्गावरील वृक्षवल्ली पुन्हा बहरेल व वातावरणात होणारा बद्दल ही थांबेल असे निसर्गप्रेमी व प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे.
Comments
Post a Comment