सात महिण्यापुर्वी कोलाड नाक्यावरील मुख्य रहदारीच्या ठिकाणी रस्ता उखडला!

 वाहनचालकांसह प्रवाशी वर्गाच्या जिवाला धोका!

  बांधकाम विभाग पाहते आहे कोणाच्या तरी मृत्यूची वाट!

 प्रवाशी वर्गाचा संतप्त सवाल?

  गोवे-कोलाड (विश्वास निकम) सात महिन्यांपासून मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील केंद्रस्थानी असलेल्या कोलाड नाक्यावरील मुख्य रहदारीच्या ठिकाणी रस्ता प्रचंड उखडल्याने वाहनचालकांसह प्रवाशी वर्ग यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून कोणाचा तरी जिव गेल्यावर या उखडलेल्या रस्त्याचे काम केले जाईल काय? असा संतप्त सवाल प्रवाशी वर्गातून व्यक्त केला जात आहे.

                पावसाळा सुरु होण्यासाठी एक महिना शिल्लक असून ही या उखडलेल्या रस्त्याचे काम केले अद्याप पुर्ण केले नाही.हा रस्ता एवढा प्रचंड उखडला आहे. कि थोडा जरी पाऊस पडला तरी या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होईल व येथून मार्ग काढतांना प्रवाशी वर्गाला तारेवरची कसरत करावी लागेल. यामुळे मोठा अपघात होणाची शक्यता निर्माण झाली आहे.

            गेल्या वर्षी प्रचंड पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते पूर्णतः उखडले गेले आहेत त्यातच कोलाड कडून रोहा कडे जाणारा रस्ता पावसाळ्यात उखडला आहे. येथील कोलाड नाक्यावरील असणारी प्रचंड रहदारी हा रस्ता अधिकच उखडला गेल्याने येथे पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना खबरदारी घ्यावी लागत असून या भागात वाहने हळू चालवावी लागत असून यामुळे वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे.

               मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या कोलाड नाक्याच्या आजूबाजूला ६० ते ६५ गावे वाडया, वस्त्या असल्यामुळे बाजारासाठी असंख्य नागरिक येजा करीत असतात तसेच या परिसरात शाळा, कॉलेज पॉलिटेक्निकल कॉलेज असल्यामुळे असंख्य विद्यार्थी येजा करीत असतात यामुळे येथे नागरिकांची सतत वर्दल दिसून येते तर धाटाव एम आय डी सी, रोहा,अलिबाग, मुरुडकडे जाणारी येणारी वाहने याची वाहतूक मोठया प्रमाणावर होत असते यामुळे वाहन चालकांसह,प्रवाशी,तसेच पादचारी नागरिक यांना येथून येजा करतांना आपला जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून याकडे सार्वजनिक बांधकाम खाते तसेच संबंधितांनी त्वरित लक्ष देऊन या उखडलेल्या रस्त्याचे काम करावे अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog