20 वर्षा नंतर महाविद्यालयीन मित्रांचे स्नेह संवाद!

 सामाजिक बांधिलकी जपत परस्पर मैत्रीपूर्ण आदरभाव वृद्धिंगत करत केले एकत्रीकरण साजरे!

रोहा (प्रतिनिधी ) रोहा तालुक्यातील सुधागड एज्युकेशन सोसायटी संचालित द.ग.तटकरे कोलाड हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विद्यासंकुळ मधील सन - २००२ बारावीची कॉमर्स बॅचच्या मित्र मैत्रिणींचे स्नेहसंवाद साधत जपली सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून परस्पर आत्मिक आदरभाव वृद्धिंगत  करून एकत्रीकरण साजरे केले.

         शालेय - महाविद्यालयीन जीवनातील विद्यार्थी - विद्यार्थिनी मित्र मैत्रीण मंडळी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करून नोकरी व्यवसायात आदी विविध क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या वाटचाल करीता आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळूनच कोणी सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, कला - क्रीडा साहित्यिक आदी आवडीनुसार क्षेत्र निवडून नित्य दैंनदीन कर्तव्य बजावित असताना महाविद्यालयीन जीवनातील मित्र - मैत्रीणींच्या सहवासातील आठवणीतले स्पर्धात्मक युगात स्पर्धा परीक्षा व संघर्षमय वाटचालीत अभ्यासाचे दिवस डोळ्या समोर उभे राहिले की आठवते ते महाविद्यालयीन मित्र - मैत्रिणींनी एकत्रित येऊन गोड गप्पा - टप्पा, विनोद शैली जागृत ठेवीत सुप्त गुणांना वाव मिळावेत या उदात्त हेतूने प्रेरित होऊन व्हॉट्स ॲप,फेस बुक, इंस्टा ग्राम आदींच्या माध्यमातून महाविद्यालयीन मित्र - मैत्रिणींचे परस्पर मैत्रीपूर्ण सबंध,एकमेका बद्दल प्रेम जिव्हाळा वृद्धिंगत व्हावे म्हणून संसारात रममाण झालेल्या मित्रांना युवा नेतृत्व दिनेश धनवी व  दर्शन मांडलुस्कर  यांनी अथक प्रयत्न करून अतिशय परिश्रम घेत एक एका मित्र - मैत्रिणींना समुहामध्ये सहभागी करून नित्याच्या व्हॉट्स ॲप ग्रूप वरील चॅटिंग करताना सहजच  बोलता बोलता  एक चांगली संकल्पना पुढे आली ती म्हणजे वीस वर्षांपासून दुरावलेल्या मित्रांच्या गाटीभेटीचा एक दिवस स्नेह संवाद साधण्याचा निमित्त होते ते गेट टू गेदर,स्नेह संमेलन म्हणजे महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देण्याचा दिवस. वीस वर्षानंतर माझा कॉलेजचा मित्र मला भेटणार आहे या अविर्भावात सर्वांच्याच चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता.

   यावेळी प्रथमतः पुगाव येथील कवितके फॉर्म हाऊस येथे श्रीगणपती बाप्पांची पूजन आराधना करून तब्बल वीस वर्षांनी भेटी झाल्याने एकमेकांना स्मित हास्य करीत हस्तांदोलन करून देत आपापली खुशाली विचारत वर्गातील अल्लडपणाने कळत नकळत घडलेले विनोदी किस्से, जोक्स आठवून मोठ्या आपुलकीने विचारपूस केल्यानंतर कोविड कालावधी मध्ये केलेल्याचा सामाजिक कार्याची प्रशंसा व दाखल घेत रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात नावारूपाला आलेले रोठ बु!! ग्रा.पं. सदस्य भाजपा युवा मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या पत्नी श्रद्धा घाग( श्रद्धा इंगवले) यांच्या समाज कार्याची प्रशंसा करून दखल घेत त्यांच्यासह गारमेंट टॅग प्रिंटिंगचे उत्पादक व सामाजिक कार्यकर्ते श्री किशोर कोदे तथा ,भारतीय सैनिक दलातील निलेश दिसले,विमा प्रतिनिधी कल्पना लहाने आदींचे यथोचित सन्मानपूर्वक आदर सत्कार करण्यात आले.

     महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देत गप्पा टप्पा विनोद जोक्स करीत प्रत्येकाच्या आवडीनुसार स्नेह भोजनाची स्पेशल मेजवानी तर मुख शुध्दी करिता आइसस्क्रीम,कोल्ड ड्रिंक्स असे मेनू ठेवण्यात आले होते.

        यावेळी आयोजक व संयोजक व्यवस्थापक दिनेश धनवी,दर्शन मांडलुस्कर, दिनेश महाडिक,गणेश सानप,मंगेश सानप, किशोर कोडे, नरेश लहाने,समीर भोसले,सतीश बाईत,सतीश म्हसकर,विलास भोनकर ,निलेश दिसले, कावेरी सरनाईक, रशिका धामसे,रोशनी महाले,रोशनी पोटफोडे, श्रद्धा इंगवले, योगिता टिकोणे आदी विविध क्षेत्रांमध्ये नाव कमावलेल्या मित्र - मैत्रिणी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते..

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आयोजक व संयोजक व्यवस्थापक दिनेश धनवी, दर्शन मांडलुस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन सतिश बाईत,मंगेश सानप यांनी व्यक्त करून सर्वांना पुढील नियोज करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येत  सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने निदान दर महा महिन्यांनी तरी अश्या स्नेह संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावेत असे आवाहनही केले.

Comments

Popular posts from this blog