सांगडे रोहा येथे 16 मे रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन!

खांब (नंदकुमार कळमकर ) रोहा तालुक्यातील सांगडे येथे लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा ,पनवेल हॉस्पिटल पनवेल, तक्षशिला बौद्ध विकास संघ सांगडे यांच्या विद्यमाने व ग्रामस्थ महिला व युवक मंडळ सांगडे यांच्या सहकार्याने तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन सोमवार तारीख 16 मे 2022 रोजी मौजे सांगडे रोहा येथे करण्यात आले आहे.

सर्व आजारांवर विशेषतः स्रियांच्या विविध आजारांवर आयोजित केलेल्या या मोफत शिबिरात रक्तातील साखरेचा प्रमाण व ब्लेड प्रेशर तसेच महिलांच्या विविध आजारांच्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मोफत तापासले जाणार तसेच मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती लायन्सक्लब चे सेक्रेटरी लायन रविंद्र लोखंडे यांनी दिली आहे तर सर्व सामान्य रुणांनी याचा आवश्य लाभ घेत तापसनीआंतर्गत उपचार केले जाणार असून याचा लाभ घ्यावा अशी माहिती देत रुग्णांना आवाहन करण्यात आले आहे .

तसेच या बाबत अधिक माहिती देतांना सांगितले की पनवेल हॉस्पिटल आणि आय सी यु पनवेल येथे वरील योजनेअंतर्गत पुढील आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातील 

यात महिलांची सर्व साक्षरण तपासणी मासिकपाळी संबंधी समस्या,कंबरदुखी ,सफेदपाणी धुपनी, अतिरक्तस्राव , पोटदुखी ,गर्भाशयाचे आजार व सूज,गर्भाशयातील ट्युमर तसेच तोंडावरील जखम,कॅन्सर,रक्ताचे विकार,स्तनावरील गाठी ,ताठरपणा व कॅन्सर,मेनोपॉज (menopause) मानसिक असंतुलन ,अमोनिया, मधुमेह,रक्तदाब तसेच मुतखडा यावर दुर्बीद्वारे उपचार,मूत्रपिंड मूत्रमार्ग विकार पौरुष ग्रंथी ( पोस्ट्रेट ग्रँथी ऑपरेशन ) पोटाचे विकार व शस्त्रक्रिया , अर्थोस्कॉपी (गुडघ्याची शस्त्रक्रिया ) न्यूमोनिया, दमा,व फुफुस आजारांवरील उपचार तसेच इतर विविध आजारांवरील तपासण्या तज्ञांच्या वतीने मोफत तपासत उपचार केले जाणार आहेत ,

तसेच लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा, पनवेल हॉस्पिटल पनवेल, तक्षशिला बौद्ध विकास संघ सांगडे, यांच्या विद्यमाने व ग्रामस्थ महिला व युवक मंडळ सांगडे, यांच्या सहकार्याने तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केलेल्या या शिबिरात तपासणीसाठी मुबंई येथील तज्ञ डॉक्टर व त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार असून Dr kiran Ahirrao MD (med) Dr Sayali Kanetkar (MD) , Dr Suresh Karande, (MD) dr farid chimawkar (general surgeon ) dr vinod gandhi (general surgeon ) यासाठी अधिक माहितीसाठी रुग्णांनी लायन नितेश शिंदे मो. 9272751001 व महेश तुपकर मो. 9822393373 या नंबरवर संपर्क साधून आपली नावे नोंदणी करावी तसेच शिबिरास येतेवेळी रुग्णांनी मूळ पिवळे व केशरी रेशन कार्ड तसेच आधार कार्ड किंवा मतदान ओळख पत्र सोबत घेऊन येणे त्याच बरोबर आजारांचे जुने रिपोर्ट व रुग्ण नातेवाईक यांचे मोबाईल नंबर आवश्यक सोबत ठेवावेत.

या आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा गरजू रुग्णांनी आवश्य लाभ घेवा असे आवाहन लायन्सक्लब व पनवेल हॉस्पिटल पनवेल यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog