श्रीराम जन्मोत्सवानिमीत्त रोह्यात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन






 रोहा (राजेश हजारे)श्रीरामचंद्र देवस्थान ट्रस्ट,रोहा यांचे शंभर वर्षे वरील राम मंदिरात दि.२ एप्रिल २०२२ते१०एप्रिल २०२२पर्यंत विविध.धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे शनिवार,दि २-४-२२रोजी सकाळी ध्वजारोहण, अभिषेक व सायंकाळी ह.भ.प.शेळके महाराज यांचे किर्तनाने या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रामायण एक महाकाव्य या विषयावरील प्रवचनाने सुमेधाताई आठवले यांनी रामायणाचे विविध पैलू आपल्या अभ्यासपूर्ण प्रवचनात विषद केले. तसेच किर्तनकार सौ. सुषमा मा.भावे,सौ अंजली कवळे यांची सुश्राव्य किर्तनाने वातावरण राममय झाले होते सौ. प्राची भिडे यांच्या श्रवण भक्ती या विषयावरील प्रवचनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले अशा एकंदरीत चालू असलेल्या सोहळ्यामध्ये सौ.मेघना ओक,यांचे किर्तन सौ आरती धारप यांचे प्रवचन,सौ श्वेता आठवले व आदी किर्तनकारांची किर्तन व भजनाचा कार्यक्रम दि.१०-२-२२पर्यंत होणार आहे तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी असे ट्रस्टचे अध्यक्ष जालींदर शेवाळे यांनी सांगीतले






 सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जालींदर शेवाळे,संजय कवितके,जगदीश शेठ दामाणी,संजय साने,ऊमेश जोशी आदि आजी माजी ट्रस्ट चे पदाधिकारी कार्यकर्ते मेहनत घेत आहेत तसेच सोमवार दि.११-४-२२रोजी सायंकाळी ठिक ५.००वाजता निघणाऱ्या श्री रामपालखी मिरवणूक सोहळ्यात जास्तीत जास्त भाविकांनी ऊपस्थित रहावे असे आव्हान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

 छायाचित्र - राजेश हजारे रोहा,

Comments

Popular posts from this blog