महादेववाडी येथे रामनवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
संग्रहित छायाचित्र |
कोलाड (विश्वास निकम ) गुरुवर्य वै. ह.भ.प. आलिबागकर महाराज, वै. ह.भ.प. गोपाळ महाराज वाजे (पंढरपूर ), गुरुवर्य वै. ह.भ. प. धोंडू महाराज कोल्हाटकर (पंढरपूर ), वै. ह.भ.प. सिताराम दाजी खांबकर महाराज (महादेववाडी )वै. ह.भ.प.श्रीधर महाराज बाईत (भागाड )यांच्या कृपा आशिर्वादाने सालाबाद प्रमाणे होत असलेला रामनवमी निमित्ताने अखंड हरीनाम यज्ञ सोहळा ह.भ.प.नारायण गोपाळ वाजे महाराज (पंढरपूर मठाधीपती )यांच्या कुशल मार्गदर्शनानुसार व महोत्सवाच्या सुभागमन प्रसंगी महादेववाडी (कोलाड )येथे रविवार दि.१०/४/२०२२ चैत्र शुद्ध नवमी ते बुधवार दि.१३/४/२०२२ पर्यंत अखंड हरीनाम सप्ताह व श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायणाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या निमित्ताने दररोज पहाटे ४ते ६ काकड्याचे भजन, सकाळी ८.३० ते १२.३० वा. व सायंकाळी ३ते ५ पर्यंत श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण ५.३० ते ६.३० प्रवचन, सायं.६.३० ते ७.३० हरिपाठ, रात्री ९ ते १२ हरिकीर्तन होईल, तसेच रविवार दि.१०/४/२०२२ रोजी सकाळी ९ ते १२ ह.भ.प. बबन महाराज वांजळे (वांगणेवाडी ) यांचे श्री राम जन्माचे किर्तन, रात्री ९ ते १२ ह. भ. प. नित्यानंद महाराज मांडवकर (चणेरा )यांचे किर्तन,सोमवार दि.११/४/२०२२ रोजी रात्री ९ ते १२ ह.भ.प. कु. शितलताई साबळे महाराज (नगर )यांचे किर्तन, मंगळवार दि.१२/४/२०२२ रोजी रात्री ९ ते १२ ह.भ.प. पुरषोत्तम महाराज पाटील (धाटाव ) यांचे किर्तन, बुधवार दि.१३/४/२०२२ रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प. विजयानंद महाराज तेलंगे (तळवली )यांचे काल्याचे किर्तन, सायंकाळी ५ ते ८ पर्यंत श्रीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येईल.
सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष नथुराम बाईत,उपाध्यक्ष धोंडू चितलकर, सचिव चंद्रकांत भऊर,खजिनदार शांताराम बाईत, हिशोब तपासणीस पांडुरंग बाईत,चंद्रकांत बाईत,सुनिल भऊर,ग्रामस्थ मंडळ,श्रीराम मित्रमंडळ, नवतरुण युवक मंडळ,व महिला मंडळ महादेववाडी (कोलाड)अथक परिश्रम घेत आहेत.
Comments
Post a Comment