राष्ट्रीय तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत कु.आर्या लोखंडे ही सुवर्ण पदकाची मानकरी 

       कोलाड( विश्वास निकम )राष्ट्रीय तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धा ही महाड बिरवाडी येथे दि.२४ मार्च ते २७ मार्च २०२२ रोजी ११ वी व १२ वी स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूल खांबची कु. आर्या रविंद्र लोखंडे हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदक पटकावले.

               यावेळी आर्याचे प्रशिक्षक विशाल कदम सर,बाळू ढेपे सर, ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूल चेअरमन रविंद्र लोखंडे सर, राष्ट्रीय तिरंदाजी चॅम्पियन असोसिएशनचे सहसचिव संतोष जाधव सर, मुख्याध्यापिका रिया लोखंडे यांच्या मार्गदर्शनाने आर्या लोखंडे हिने सुवर्ण पदक पटकावले

              यावेळी पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे व आ.भरतशेठ गोगावले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या यशा बद्दल आर्या लोखंडे हिचे कोलाड-रोहा लायन्स क्लबचे पदाधिकारी व सर्व सदस्य तसेच ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूलचे अध्यक्ष, मुख्यध्यापक, पालक शिक्षक वर्ग, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog