ज्येष्ठ निरुपणकार डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी निमित्त माणगावमध्ये केली स्वच्छता

 स्वच्छता मोहीमेत 1110 सदस्य सहभागी!

माणगाव (प्रतिनिधी) आपल्या श्री बैठकीच्या निरुपणादवारे समाजातील व्यसनमुक्ती ,अंधश्रद्धा निर्मूलन करणे यासह मनुष्याच्या अंगी सदगुण ,सदविचार बाणावेत याकरिता डॉ .श्री .नानासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या श्री बैठकीदवारे जनजागृती करून आपली ही शिकवण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवली.


   डॉ .श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्टानच्यावतीने अनेक सामाजिक कार्य होत असतात. मा.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पदमश्री आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉ. सचिन दादा ,धर्माधिकारी, श्री.राहुलदादा धर्माधिकारी ,श्री.उमेशदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि.1मार्च 2022 रोजी श्रीबैठक माणगावने माणगाव शहरात1,110 श्री सदस्यांनी सहभाग घेऊन स्वच्छता केली.

       या स्वच्छता मोहीमेत उपजिल्हा रुग्णालय माणगाव, सरकारी कार्यालय परिसर , विविध रस्ते, मोरबा रोड याठिकाणी स्वच्छता केली. यादवारे एकूण 34 टन कचरा गोळा करून त्याची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावली


           यावेळी या स्वच्छता मोहीमेत माणगावचे नगराध्यक्ष श्री.ज्ञानदेव पवार, उप,नगराध्यक्ष सचिव बोंबले राजीव साबळे ,नगरसेवक अजित तारलेकर ,नगरसेवक राजेश मेथा मा.नगराध्यक्ष आनंद यादव , पत्रकार सलिम शेख ,भा.ज.पा.अध्यक्ष संजय आप्पा ढवळे ,माजी नगरसेवक नितीन वाढव. ,संदिप खरंगटेउप अधिक्षक प्रविण पाटील ,पत्रकार रविंद्र कु्वेसकर ,उप अभियंता शैलेष बुटाला ,श्री.चेतन देवधर आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog