महाशिवरात्रीला तळगड किल्ल्यावर शिवभक्तांची उसळली गर्दी!

तळा (कृष्णा भोसले) महाशिवरात्री निमित्त तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावरील शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांची एकच गर्दी उसळली.जयहरी सेवा मंडळ तळा तर्फे तळगड किल्ल्यावर आज गेल्या १३ वर्षांपासून महाशिवरात्री उत्सव आयोजित करण्यात येत आहे . त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ८ वाजता शिवपिंडीवर अभिषेक करण्यात आला व १० वाजता तळा शहरातून चलचित्र भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी अर्धांगी रुपात सजविण्यात आलेली शिवपार्वतीच्या रूपातील व्यक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.दुपारी बारा वाजल्यापासून तळगडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती महाशिवरात्रीचा उत्साह एवढा होता की भर उन्हातही नागरिक  आपल्या लहान मुलांसह तळगड चढत होते.सायंकाळी चार वाजता ह.भ.प. सरफळे महाराजांचं कीर्तन आटोपल्यावर महिला मंडळाचा हळदीकुंकू चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हळदीकुंकू ला महिलांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती सायंकाळी सहा वाजता जयहरी सेवा मंडळाच्या भजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog