रोहा तालुक्यातील डोंगरे आगीच्या भस्मस्थानी,

देवकान्हे,पुई,खांब, येथील वनसंपदेची प्रचंड हानी,

जैवविविधता धोक्यात, वनखात्याचे दुर्लक्ष,

दररोज डोंगरांना प्रचंड लावण्यात येत असलेल्या वणव्यामुळे रोहा तालुक्यातील कोलाड पुई,आंबेवाडी,वरसगाव,खांब, देवकान्हे, मालसई, या ठिकाणचे डोंगर सायंकाळच्या सुमारास अक्षरश: या वणव्यात होरपळताना दिसतात.तर सततच्या लागत असलेल्या वणव्यामुळे डोंगरात वनव्यांची ऱ्हास तर आगीचे तांडव यांनी वनसंपदेची प्रचंड हानी होत असुन यामुळे पर्यावरण प्रेमी तसेच नागरिकांचा जिव तुटत आहे तर हाकेच्या अंतरावर असलेल्या कोलाड,रोहा येथील वनखात्याला मात्र याच काहीच वाटत नसल्याचे एकंदरीत परिस्थिती वरुन दिसुन येत असल्याने वनखाते डोळे झाक करत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे .

भारत सरकार सह राज्यसरकार पर्यावरणावर कोटीच्या कोटी रुपये खर्च करून जंगलात तसेच विविध ठिकाणी सामाजिक वनीकरण खाते कोट्यवधींच्या संख्येने झाडे लागवड करण्याचा अभियान राबतात परंतु यातील किती झाडे जगली आणि किती गेली अद्याप याचा हिशेब लागला नाही मात्र यातून माणसाने स्वताच्या स्वार्थासाठी अनादिकालापासून वृक्षाची कत्तल केली आहे.सध्याच्या आधुनिकरणाच्या व तंत्रज्ञानाच्या जीवनात औद्योगिकरण व नागरीकरणाच्या नावाखाली जंगले भुईसपाट होतांना दिसत आहे.त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन पार बिघडले आहे.त्यातच भरीत भर म्हणुन ठिकठिकाणी लागल्या जाणाऱ्या या वणव्यामुळे यात अधिक भर पडत आहे.मागील जानेवारी महिन्यांपासून हे वणवे लावण्याचे प्रमाण मोठे दिसुन येत आहे.वणवे लावल्यावर कुणाचाही अंकुश नसल्याने व कायद्याचा धाक नसल्याने लाकडे चोरटे अथवा हातभट्टीदार यांचे अधिक फावत आहे.शिकार करणे,वृक्षतोड करणे,वनसंपदा मिळवणे,तसेच सरपणासाठी लागणारा लाकूडफाटा यामुळे वणवे लावले जात असले तरी हे कायद्याच्या चौकटीत बसत नसून सुद्धा वनखाते उदासीन दिसत असुन वणवे लावणाऱ्यावर कधीही कारवाई झाल्याचे आजतागत दिसुन येत नाही अथवा त्यांना पकडण्यास वनविभाग खाते अपयशी ठरत आहे.

 शिकारीमुळे वणवे लावण्याचे प्रमाण वाढले:- महेश तुपकर 

गेली सात ते आठ वर्षांपासुन शिकार करणे व इतर कामासाठी डोंगरांना वणवे लावण्याचा प्रमाण वाढत असुन यामुळे संपूर्ण वनसंपदेची प्रचंड हानी होत आहे निसर्ग ही दिवसेंदिवस आपले रूप बदलत असतांना दिसत असुन कधी चक्री वादळ तर वेळेवर येणारा पाऊस कोणत्याही महिन्यात कधीही पडू लागल्याने हवेत गर्मीचे प्रमाण वाढत आहे हे असेच सुरु राहिले तर मानवी जिवन ही धोक्यात येईल यामुळे वनखात्यासह व संबंधितानी याकडे लक्ष देऊन वणवे लावणाऱ्यावर कठोर कारवाही करावी अशी मागणी देवकान्हे धामणसई विभागातील पर्यावरण प्रेमी करत असून शिकारीमुळे वनवे लावण्याचे प्रमाण वाढले असल्याचे मत वन मित्र महेश तुपकर यांनी पत्रकारांशी व्यक्त केले

रोहा तालुक्यातील विपुल वनसंपदा लाभलेल्या मोजक्याच जंगलात खांब सुकेळीच्या डोंगराचा समावेश त्याला जोडून असलेल्या कोलाड पुई ,त्याच बरोबर सर्वात मोठा असा रोहे शहराच्या वरील हनुमान टेकडी तांबडी कारवीने याला जोडला गेलेला किल्ला , आंबेवाडी , वरसगाव, या जंगलाचा समावेश तर सुकेळी खांब,पुई हा डोंगर मुंबई -गोवा हायवे लगत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष सहज वेधून घेत आहे.त्यामुळे वनसंपदे बरोबर प्राण्यांच्या वास्तव्यावर गदा येत असुन त्यांची जैवविधता धोक्यात येत असल्याने सामाजिक वन विभाग तसेच वनखाते यांनी लक्ष केंद्रित करून वणवे लावण्याऱ्यावर कारवाही करावी अथवा विविध प्रकारची उपाय योजना आखण्यात यावी.सामाजिक युवा कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी दिनकर सानप पुई कोलाड विभाग यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog