डोंबिवली ते पाली सायकलवर प्रवास करून तरुणांनी दिला अनोखा मोलाचा संदेश

             गोवे-कोलाड (विश्वास निकम )डोंबिवली ते पाली असा सायकलवरून प्रवास करणाऱ्या तरुणांनी प्रत्येक सायकला विविध प्रकारचा पुठ्यांच्या फलक लावून त्या फलकावर झाडे लावा झाडे जगावा,नेत्र दान करा,सायकल चालवा प्रदूषणाला आला घाला, सायकल चालवा निरोगी रहा अशा विविध प्रकारचा संदेश तरुणांनी दिला.

                   गेली अनेक वर्षा पासून माघी गणेश उत्सहासाठी हे तरुण डोंबिवली ते पाली प्रवास करीत असून सायकल चालवून यातून जनतेला एक संदेश दिला जातो. दिवसेंदिवस वातावरणात होणारे बदल याला आपणच जबाबदार आहोत सायकल चालवून आपण निरोगी राहू शकतो तसेच गाडी चालवून पेट्रोल जाळून होणाऱ्या प्रदूषण टाळू शकतो यात पैशाचीही बचत होऊ शकते.तसेच नेत्र दान करून कोणाची तरी दृष्टी आणू शकता तसेच झाडे लावून ती जगवल्यावर निसर्गात होणारा बदल थांबेल अशा विविध प्रकारचे महत्वाचे संदेश यातून लोकांना देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog