नंदकुमार पवार यांच्या वतीने कोलाड ज्येष्ठ नागरिकांना आधार काठ्याचे वाटप

गोवे-कोलाड (विश्वास निकम ) आंबेवाडी नाका येथील जेष्ठ नागरिक सभागृहात मंगळवार दि.१ फेब्रुवारी २०२२ रोजी स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांची मासिक सभा मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ कुर्ले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.या मासिक सभेत ज्या जेष्ठ नागरिक सभासदांचे वय ७५ वर्षे पुर्ण झालेल्या ९० जेष्ठ नागरिकांना पुढील आयुष्य सुख समाधानाने जावो याची सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन ज्येष्ठ नागरिक मंडळाचे हिशेब तपासणीस नंदकुमार पवार यांच्या वतीने त्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी एक सामाजिक भावनेतून आधार काठीचे वाटप करण्यात आले.   

यावेळी प्रभारी अध्यक्ष मारुती राऊत,प्रविण गांधी कार्याध्यक्ष,नथू शिंदे उपाध्यक्ष, अशोक कदम चिटणीस, मंगल राऊत सहचिटणीस, शब्बीर अकबर अली मुख्य सल्लगार प्रवक्ता, नंदकुमार पवार हिशोब तपासणीस,अविनाश म्हात्रे सदस्य जिल्हा समन्यव समिती,संचालक केशव बागुल, केशव महाबळे, तुकाराम कापसे, बळीराम ठोंबरे,अनंता पवार, दगडू बामुगडे, सौ प्रणिता गांधी,महादेव महाबळे,हरिचंद्र जाधव यांच्या शुभहस्ते आधार काठीचे वाटप करण्यात आले.      

तसेच यावेळी २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मा.सुनिलजी तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे कोलाड येथे या दिनाचे औचित्य साधून ३० झेंडे उभारून यापैकी २० नं.चा झेंडा फडकविण्या साठी स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांना बहुमान व संधी दिल्या बद्दल आयोजकांचे या सभेत युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आ.अनिकेत तटकरे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.         

आधार म्हणजे लहानपणी चालण्यासाठी दिलेला आई वडिलांच्या हाताचा किंवा पांगुळगाडीचा आधार तरुणपणात पत्नीचा आधार परंतु ७५ वर्षे पुर्ण झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ महिला यांना अतिशय महत्वाची गोष्ट असते तो आधार काठी यामुळे जेष्ठ उठणे,बसने व वेळ घालवण्यासाठी चालणे याचा मुख्य आधार काठीचा असतो या काठीचा महत्व जाणून घेत त्यांना पुढील जीवनातील आधारासाठी नंदकुमार पवार यांच्या खास त्यांच्या अथक प्रयत्नातून व त्यांच्या वतीने आधार काठी वाटप करण्यात आले असून ते दरवर्षी या आधार काठ्याचे वाटप करणार आहेत त्याचप्रमाणे सभेला आलेल्या जेष्ठ नागरिकांना सुद्ध पाणी मिळावे यासाठी पाण्याचा फिल्टर ही उपलब्ध करून देणार असून सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी नंदकुमार पवार यांचे आभार व्यक्त केले.

                कोलाड स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ स्थापन करून तब्बल १२ वर्षे पुर्ण झाली तर एक तप पूर्ण केले असून सुरवातील पाच पंचवीस असणारे ज्येष्ठ नागरिक सभासद आता ५०० वर सभासद झाल्यामुळे गरजा ही वाढल्यामुळे बसण्यासाठी खुर्च्या अपुऱ्या पडत आहेत यासाठी कै. वैभव केशव बागुल यांच्या स्मनार्थ विवान यांच्या कडून ६ खुर्च्या देण्याचे सांगण्यात आले.आयोजित केलेली सभा उत्सह वातावरणात संपन्न झाली.

Comments

Popular posts from this blog