तळा नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या सभापतींची निवड जाहीर
तळा (कृष्णा भोसले)तळा नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या सभापतींची निवड नगरपंचायत कार्यालयात बुधवार दि.१६ रोजी जाहीर करण्यात आली.त्यामध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्षा सौ.अस्मिता चंद्रकांत भोरावकर, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व शिक्षण सभापतीपदी सौ.अर्चना विजय तांबे,महिला,बालकल्याण क्रिडा व सांस्कृतिक सभापतीपदी कुमारी यामिनी जनार्दन मेहत्तर, सार्वजनिक बांधकाम व दिवाबत्ती सभापतीपदी उपनगराध्यक्ष चंद्रकांत महादेव रोडे,पाणीपुरवठा व जल नि:सारण सभापतीपदी गटनेते मंगेश रामचंद्र शिगवण,पर्यटन विकास व नियोजन सभापतीपदी अविनाश रविंद्र पिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तसेच स्विकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी कडून प्रकाश गायकवाड तर शिवसेनेकडून भास्कर गोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.निवड झालेल्या सर्व सभापती व स्विकृत नगरसेवकांचे पीठासीन अधिकारी विठ्ठल इनामदार व दयानंद गोरे यांनी अभिनंदन केले या प्रसंगी शिवसेना,भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Comments
Post a Comment