महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संपन्न

सुतारवाडी  (हरिश्चंद्र महाडिक)महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा कोकण विभाग अध्यक्ष मा. श्री.डाॅ.सतिश भालचंद्र वैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व युवा कार्यकारीणी (गुरू निवास,नविन वसाहत,श्री संत आळी पेण रायगड)येथे संपन्न झाली. या सभे मध्ये रायगड जिल्हा युवा अध्यक्ष पदी मा.श्री. सिध्दांत शेलार खोपोली ,युवा कार्याध्यक्ष श्री चंद्रकांत निगडे उसरबुद्रूक माणगाव , युवा सचिव श्री. प्रथमेश काळे नागोठणे , युवा उपाध्यक्ष श्री नरेश राऊत पाली, युवा उपाध्यक्ष श्री निलेश लोखंडे पेण , युवा खजिनदार श्री उदय महाडीक खोपोली , युवा उप कार्याध्यक्ष श्री राजेंद्र वाचकवडे कोलाड,युवा उप सचिव श्री प्रविण राणे अलिबाग ,युवा सदस्य कु.अविष्कार झगडे वेळास,युवा सदस्य श्री वैभव पिंगळे कर्जत ,युवा सदस्य श्री संजय शेडगे महाड व रायगड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा.श्री. हरिश्चंद्र महाडिक आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

या सभे साठी कोकण विभाग कार्याध्यक्ष श्री गणेश धोत्रे, रायगड जिल्हा अध्यक्ष श्री गणेश महाडिक, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष श्री संतोष पोटे, कोकण विभाग युवा अध्यक्ष श्री संतोष रहाटे, पेण तालुका अध्यक्ष श्री जितेंद्र लोखंडे,पेण शहर अध्यक्ष श्री गणेश शेलार,शहर सचिव श्री संतोष टेकावडे, जेष्ठ मार्गदर्शक ह.भ.प.श्री दिगंबर महाराज राऊत, रोहा तालुका अध्यक्ष श्री संतोष कोते, तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.

या सर्व समाज बांधवांनी नवनिर्वाचित युवा कार्यकारीणीचे अभिनंदन केले व पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog