हडप केलेली वडीलोपर्जित जमीन परत मिळविण्यासाठी ८८ वर्षीय वसंत जाधव न्यायासाठी शासन दरबारी फिरताहेत
पायी पायी!
मला कोणी न्याय देईल का? पत्रकारांशी मांडली कैफियत
आजोबा न्यायाच्या प्रतिक्षेत!
सुतारवाडी : (हरिश्चंद्र महाडिक) कुडली (ता. रोहा ) येथील वयोवृद्ध नागरिक श्री. वसंत दत्तात्रेय जाधव, वय ८८वर्षे यांनी पत्रकारांशी संपर्क साधुन आपली वडिलोपार्जित जमीन एका व्यक्तीने त्यांची परवानगी न घेता सन 1991 ला हडप केली असल्याचे सांगितले. तेव्हापासून आज तगायत शासन दरबारी हेलपाटे मारूनही कोणी मला न्याय देत नाही. कोरोना काळात एस. टी., रिक्षा बंद असताना मी कुडली ते रोहा असा 25 कि. मी. पायी प्रवास करून रोहा तहसिल कार्यालयात जायचो आज ही मी गाड्यांची वाट न पाहता 25 कि.मी. पायी अंतर पार करून या वयात न्यायासाठी धडपड करत आहे. मी दररोज सकाळी घरांतून पायी निघतो. आता या गोष्टीची काहीजण टिंगल करत आहेत. कोणी कितीही माझ्याबद्दल टिका करो मी मात्र मला न्याय मिळेपर्यंत अखेरच्या क्षणापर्यंत माझी हडप केलेली जमिन मिळविण्यासाठी प्रयत्न करतच राहणार आहे.
श्री. वसंत जाधव यांच्या म्हणण्या नुसार ज्याने त्यांची जमिन हडप केली आहे. त्याला वकिलांमार्फत नोटीसही पाठविली आहे परंतु त्याचा अद्यापही काही उपयोग झालेला नाही. तरी सुद्धा जिद्द न सोडता आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल या आशेवर श्री. वसंत जाधव पायपिट करून हक्काच्या जमिनीसाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांना पायपिठ करावी लागत असून त्यांचे म्हणणे आहे की, मी पायी प्रवास करताना काही जण चेष्टा करतात त्यांनी माझी स्थिती समजून घ्यावी उगाचच चेष्टा करू नका.
श्री. वसंत जाधव यांच्याकडे पुराव्यासाठी योग्य ती कागदपत्रकं आहेत.
Comments
Post a Comment