सुकेळी खिंडीत जिवघेणे खड्डे, कोणाचा तरी जिव गेल्या नंतर सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग येईल काय?
प्रवाशी वर्गाचा संतप्त सवाल?
गोवे -कोलाड (विश्वास निकम ) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग १७ वरील सुकेली खिंडीत तीव्र उतारावर प्रचंड मोठ मोठे खड्डे पडले असून या खड्डयांतुन प्रवाश करतांना प्रवाश्यांना करावी लागते तारेवरची कसरत तर कोणाचा जिव गेल्या नंतर सार्वजनिक बांधकाम खाते व संबंधित ठेकेदार यांना जाग येईल काय? अशा संतप्त सवाल प्रवाशी वर्गातून केला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर दरम्यानचे चौपदरी करणाचे काम गेली १२ वर्षापासुन सुरु असूनही या कामात अद्यापही प्रगती नाही.याउलट पावसाला संपून तीन महिने झाले तरी पावसाळ्यात रस्त्याला पडलेले मोठ मोठे खड्डे अद्यापही भरले गेले नाहीत याचा नाहक त्रास प्रवाशी वर्गाला होत आहे.
नागोठणे कडून खांब कडे जाणारा सुकेली खिंडीलील चढ उतारावरील रस्ता अतिशय भयानक बनला असून या रस्त्याला पडलेले मोठ-मोठे खड्डे चढ उतारावर असल्यामुळे हे खड्डे वाहन चालकांच्या चटकन लक्ष्यात येत नसल्याने येथे अपघाताचा धोका अधिकच वाढलेला आहे काल या खड्डयातुन प्रवास मोठया कंटरनेरचे पाटे तुटले तसेच एक टुव्हीलर स्वार या खड्डयातुन जात असतांना गाडी सिल्प टुव्हीलर स्वार जखमी झाला. तसेच या खड्ड्यातून प्रवास करतांना मणक्याचे आजार, कंबर दुःखी या सारखे आजाराला प्रवाशी वर्गाला सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्याचे काम वाढीव निधी मिळूनही का थांबला गेला आहे.एखादा कर्ता प्रवाशी या खड्डयातुन प्रवास करतांना जखमी होऊन मृत्यू झाला तर त्याचे सर्व कुटूंब उद्योस्त्त होते अशा घटना ही घडलेल्या आहेत.१२ वर्षांपासून या महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम सुरु असून प्रत्येक वर्षी ७ किलोमीटर काम केले असते तरी या महामार्गाचे काम पूर्ण झाले असते. सुस्त झालेले सार्वजनिक बांधकाम खाते व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे याचा त्रास प्रवाशी वर्गाला होत असून आता तरी या रस्त्याचे काम पुर्ण करण्यासाठी जाग येईल काय? असा संतप्त सवाल प्रवाशी वर्गातून केला जात आहे.
Comments
Post a Comment