रोहा येथे फ्रॅक्चर व अर्थोपेडिक क्लिनिकचा शुभारंभ,

 रुग्णांना 24 तास सेवा मिळणारे एकमेव क्लिनिक

कोलाड (श्याम लोखंडे) रोहा येथील नामवंत स्त्री रोग तज्ञ डॉ रघुनाथ भट यांनी साकार केलेल्या फ्रॅक्चर व अर्थोपेडिक क्लिनिकचा शुभारंभ 6 फेब्रुवारी रोजी रोहा नगरीचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले .

रोहा येथील दत्तसागर हौसिंग सोसायटी पंचायत समिती रोड डॉ भट नर्सिंग होम च्या बाजूला 24 तास अपघातग्रस्त ,हाडांचे व संधिवात रुग्णांच्या सेवेसाठी नव्याने साकार करण्यात आलेल्या डॉ भट व अर्थोपेडीक तज्ञ डॉ प्रशांत गोसावी यांचे फ्रॅक्चर व अर्थोपेडिक दवाखाना तसेच पॅथॉलॉजी लॅबचा शुभारंभ नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या शुभहस्ते व डॉ रघुनाथ भट,डॉ सौ मंजिरी भट,डॉ प्रशांत गोसावी,डॉ सौ प्रिया गोसावी,यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला या प्रसंगी नगरसेवक महेश कोल्हटकर, मयूर दिवेकर,महेंद्र गुजर,समीर सपकाळ,माजी नगराध्यक्ष समिरशेठ शेडगे,पॅथोलॉजीक महेश गोसावी,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आले.

अक्सिडंट व फ्रॅक्चर अर्थोपेडीक क्लिनिक करता 24 तास रुग्णांच्या अत्यावश्यक सेवेसाठी लाभलेले अस्थिरोग तज्ञ डॉ प्रशांत गोसावी हे सदरच्या दवाखान्यातून रुग्णांना सेवा देणार आहेत डॉ रघुनाथ भट यांच्या विशेष प्रयत्नातून साकार करण्यात आलेल्या या क्लिनिक मधून डिजिटल एक्सरे,प्लॅस्टरची सुविधा,फ्रॅक्चर टेबल,हाडांच्या व संधिवातावर सुविधा या रुग्णालयातुन मिळणार आहेत.

आशा क्लिनिकचे शुभारंभ मोठ्या उत्साह वातावरणात रोहा येथ डॉ रघुनाथ भट व डॉ मंजिरी भट,डॉ प्रशांत गोसावी,यांच्या विशेष प्रयत्नातून रोहेकरांसाठी उपलब्ध झाले असल्याने त्यांना उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत यावेळी शुभेच्छा दिल्या.तसेच रोहा येथील नामवंत तज्ञ डॉ निशिकांत ध्रुव,डॉ सौ पूर्वी ध्रुव,फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉ स्नेहल शेलार, क्रांती कोळेकर,डॉ अतुल पाटील ,प्रशांत दोशी,रोहित क्षीरसागर,अनामिका लोहारे,डॉ सलमा मुकादम, कांचन कदम ,ऋचा दालमिया ,नंदिनी तेलंगे,पुरुषत्तम भोईर, अभिषेक शाहसने, डॉ व सौ.खैरकर ,डॉ विनोद गांधी , कोलाड आंबेवाडी आरोग्य केंद्राचे डॉ महेश वाघ,गिरीराज हेल्थ केअर पॉलिक्लिनिक प्रवीण जैनसर , एक्सरे टेक्निशन राकेश कागडा यांच्या सह रोहा, नागोठणे,कोलाड येथील अनेक डॉक्टरांनी व त्यांच्या हितचिंतक मित्र परिवानी त्यांचा शुभेच्छा व सदिच्छा दिल्या .





Comments

Popular posts from this blog