राधाकृष्णाचे गीत गाऊन श्रोत्यांची मने जिंकणाऱ्या सानिका बेंडकर विद्यार्थिनीचे पाली पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस उपनिरीक्षक राम पवार यांनी केला गुणगौरव,

 चिपळूण( प्रतिनिधी)स्वानंद सुखनिवासी सद्गुरु शिगवण महाराज स्थापित हरी ओम सतनाम वारकरी संप्रदाय समाज आयोजित अखंड हरिनाम सप्ताह महा नाम जप यज्ञ केले व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन नुकतेच श्रीक्षेत्र शिरगाव तालुका चिपळूण येथे करण्यात आले होते

सदर सप्ताह दिनांक 29 डिसेंबर 2021 ते 5 जानेवारी 2022 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते या सप्ताहामध्ये राधाकृष्णाचे उत्कृष्ट गीत गाऊन त्यांची मने जिंकणाऱ्या सानिका दीपक बेंडकर राहणार कुंभार्ली सांगळेवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या विद्यार्थिनीचे रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली पोलिस स्टेशनचे कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम मारुती पवार यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन गौरव  करण्यात आला.

तसेच सानिकाने तिच्या पुढील वाटचालीमध्ये, भावी जीवनात खूप प्रगती करून आपल्या आई-वडिलांचे गुरुजनांचे गावाचे नाव लौकिक करावे म्हणून शुभेच्छा देऊन कौतुक केले.

सदर स्वानंद सुखनिवासी सद्गुरू शिगवण महाराज संस्थापित हरिओम सनातन वारकरी संप्रदाय समाज आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व महा नामजप यज्ञ ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास खूप वर्षांची परंपरा असून दरवर्षी श्रीक्षेत्र शिरगाव तालुका चिपळूण येथे सप्ताह मध्ये भाविक जात असून हजारो भाविक सप्ताहामध्ये येत असतात.

Comments

Popular posts from this blog