विळा येथील आठवडा बाजार ग्रामीण जनतेला वरदान

        सुतारवाडी :  (हरिश्चंद्र महाडिक ) ग्रामीण भागात भरणारा आठवडा बाजार हा अनेक ठिकाणच्या नागरिकांना लाभदायी ठरतो कारण त्या ठिकाणी मिळणारा भाजीपाला, कांदे, बटाटे, सुकट, बोंबील असे त्याचप्रमाणे पावसाळी साठवणूकीसाठी लागणारे वाल, चवळी, हरभरे, सुकी मासळी या वस्तू मोठया प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे ग्रामस्थांना आठवडाभराचा भाजीपाला बाजारातून आणणे शक्य होते. 

                 विळे - भागाड या ठिकाणी दत्तमंदिराच्या पलिकडे भरणारा बुधवारचा आठवडा बाजार येथील दशक्रोशिमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना तसेच कंपनी कामगारांना हा बुधवारचा बाजार प्रेरणादायी ठरला आहे . अनेक प्रकारच्या भाज्या, फळे, सुकट, बोंबिल, वाकट्या, सोडे, तयार कपडे, ओलीमासळी, खेळणी, कडधान्य, बेकरीतील वस्तू, आईस्क्रिमसह अन्य गृह उपयोगी वस्तू या बाजारात उपलब्ध असतात.

                 मुख्य म्हणजे विळे - भागाड परिसरात - विविध कंपन्या सुरु झाल्या आहेत . त्यामुळे या परिसरामध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. येथील कामगारांना तसेच स्थानिक नागरिकांना हा आठवडा बाजार महत्वाचा ठरला आहे. पुणे - माणगाव, भिरा कोलाड कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला हा बाजार भरत असल्यामुळे या ठिकाणी वाहनांची कमतरता भासत नाही. 

                 मात्र या बाजारात विक्रेते येतात त्यांमध्ये स्थानिक विक्रेते फारच कमी प्रमाणात आहेत. स्थानिकांनी लक्ष टाकून आपलाही व्यवसाय सुरु करण्यास हरकत नाही. त्यामुळे स्थानिकांनाही रोजगाराची संधी मिळेल आणि ग्रामपंचायतीचे सुद्धा उत्पन्न वाढेल. कोरोनामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. त्यांनी व्यवसाय करणे आवश्यक आहे.


Comments

Popular posts from this blog