चिरंजीवी संघटनेचे १०५ वे उपोषण जिनियस मैत्रकूल मध्ये पार पडले

  निजामपूर ( प्रतिनिधी )  चिरंजीवी संघटना ही जिज्ञासू बालकांची मानवतावादी संघटना आहे.बालमजुरी, बालभिकारी,बालविवाह अशा अनेक प्रश्नावर गेली ९ वर्षे काम करत आहे.बालकाचे बालपण जगता यायला हवे ह्यासाठी  मानगाव मधील जिनियस मैत्रकूल कडापे येथे  १०५ वे उपोषण संघटनेची राष्ट्रीय सचिव श्वेता पाटील यांनी केले. जिनियस मैत्रकूल चे हितचिंतक आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन गंगावणे सर ह्यांनी उपोषणाची सुरुवात केली व मोहिमेला पाठींबा दर्शविला. असे संघटनेचे राज्य  सचिव भार्गव पाटील ह्यांनी मत व्यक्त केले. 

त्याचबरोबर उपोषण समारोमासाठी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते, महाड येथील पूरग्रस्तांच्या मदतीला उभे राहणारे त्याचबरोबर जिनियस मैत्रकूलचे हितचिंतक आधारस्तंभ सागर खानविलकर हे उपस्थित होते. इतक्या लहान वयात सामाजिक कार्याची सकारात्मक ऊर्जा चिरंजीवी कार्यकर्त्यांमध्ये आहे अशी कौतुकाची थाप मान्यवर उपस्थितीनी कार्यकर्त्यांना दिली असे संघटनेचे राज्य संघटक हर्ष तेलुरे ह्यांनी सांगितले.



Comments

Popular posts from this blog