समाजसेवक,शिक्षणप्रेमी,
निलेश भाई महाडीक यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार
रायगडातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!
गोवे-कोलाड (विश्वास निकम)रोहा तालुक्यातील पुई गावचे सुपुत्र शिक्षण प्रेमी, समाजसेवक निलेश भाई महाडीक यांना जिजाऊ बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नागमठाण ता, वैजापूर जि, औरंगबाद येथुन १जानेवारी २०२२रोजी आदर्श समाजसेवक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिक्षक कैलास प्रजापती साहेब, संजय निकम माजी सभापती वैजापूर,मुंबई येथील समाजसेविका श्रमिका दळवी, व आयोजक सुर्यकांत पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन करून तसेच मशाल पेटवुन करण्यात आली.तसेच या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली .
कु. निलेश भाई महाडीक यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अतिशय महत्वाची भूमिका बजावली असून त्यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीची दख्खल घेऊन जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नागमठाण यांच्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार देण्यात आला.या पुरस्काराबद्दल माजी आमदार अवधूतदादा तटकरे, युवा नेते संदिप शेठ तटकरे,पत्रकार मित्र, त्यांचे सहकारी प्रसाद खुळे, ॲड रेवती ताई तटकरे, संजय कणघरे, गौरव नाईक, ईकिंदर शेवाले, निलेश पवार, संदिप कणघरे, रोहीत पवार,आदिनी निलेश भाई महाडिक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment