बळीराजा शेतकरी सामाजिक संस्था रोहा यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी
मेढा (राजेंद्र जाधव) बळीराजा शेतकरी सामाजिक संस्था रोहा रायगड यांच्या वतीने रोहा येथे सावित्रीबाई जोतिबा फुले यांची जयंती मोठया उत्सहात साजरी करण्यात आली.
ज्या काळात स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षांपासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवले जात होते त्या काळात महारष्ट्रातील महान समाज सुधारक व दलितांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय समाजसुधारणाच्या कार्यात त्यांना खांद्याला खांदा लावून स्त्री – शिक्षण व दलित्धारक कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजातील स्रियांना शिक्षण देण्याचे मोलाचे कार्य केले याबरोबर केशवपन, विधवा विवाह बंदी, देवदासी, मुरळी, दारुडेपणा अशा चालींचे उच्चाटन करण्यासाठी संघर्ष करणारी, इंग्रजी शिक्षण, आधुनिक शिक्षण घ्या,जगातील प्रगती जाणा आणि मनुवादी व्यवस्थेला ठोकर मारा असे गर्जून सांगणारी थोर विचारवंत समजून सांगणारी सावित्रीबाई फुले ही एक थोर समाज सुधारक होत्या.अशा थोर समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी १९९५ पासून सर्वत्र साजरी केली जाते. यावेळी बळीराजा शेतकरी सामाजिक संस्था रोहा यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी रायगड जिल्हा महिला अध्यक्ष प्रियांका कांबळे,उपजिल्हा अध्यक्ष शिवाजी मूटके, सचिव राजेंद्र जाधव,खजिनदार दगडू बामुगडे, एल.जाधव राजेंद्र शिंदे शेळके महाराज इतर सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment