वांगणी हायस्कूलमध्ये घुमला क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर!

 बालिका दिनानिमित्त विविध उपक्रम 

 सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी,
रायगड (भिवा पवार) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात बालिकादिन दि. ३ जानेवारी २०२२ रोजी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या वांगणी हायस्कूलमध्ये विविध सहशालेय उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी वेशभूषा , समूहगीत , पोवाडा , नाटिका अशा विविधांगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक जे . एन्. ठाकूर यांनी दीपप्रज्वलन करून केले . यानंतर शाळेतील शिक्षक ए. एन. शेळके , एन. सी . पाटील, व्ही.ई म्हात्रे , टि. उ. खाडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाळेतील विज्ञान शिक्षक टिळक खाडे यांनी केले . कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विज्ञान शिक्षक टिळक खाडे यांनी क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जाज्वल्य जीवनकार्याचा परिचय विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानातून करुन दिला.

एकांकिका सादर करताना दहावीच्या विद्यार्थिनी,


 सावित्रीबाई फुलेंच्या वेषात आलेल्या पायल भोसले , प्रणिता जाधव , आस्था रेवाळे , सान्वी कदम या विद्यार्थीनी तर जोतिराव फुलेंच्या वेषात आलेले संजय कोकाटे , श्रवण पवार , नील जाधव , प्रेम जाधव हे विद्यार्थी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते . इयत्ता नववीतील विद्यार्थीनी दिव्या जांबेकर , निधी खरीवले , पायल कुमार , सानिया जांबेकर , श्रुती ठमके , मानसी जाधव , सानिका जाधव यांनी सावित्रीबाईंच्या जीवनचरीत्रावर ' त्रिवार नमन क्रांतीज्योतीला - आद्यशिक्षिकेला , बालिकादिनी गातो तिचे गुणगान ' हा बहारदार पोवाडा सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.

 आम्ही सावित्रीच्या लेकी,

 इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनींनी सावित्रीबाईंच्या ओव्या गाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली . शाळेतील आदर्श विद्यार्थीनी रिया मोरे हिने लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेली ' प्रत्येक कळीला फुलायचा अधिकार आहे ' ही एकांकिका इयत्ता दहावीच्या पायल भोसले , सिद्धी नावले आचल जाधव , श्रेया कदम,मानवी दळवी ,प्रणिता जाधव , श्रुती जाधव,तन्वी कदम या विद्यार्थीनींनी सादर केली . या एकांकिकेतून स्त्री स्वातंत्र्याचा व स्त्री शिक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

 आम्ही सावित्रीच्या लेकी,Comments

Popular posts from this blog