दिव्यांगाचे दाखले काढण्यासाठी गेलेल्या अपंगांचे मोठया प्रमाणात हाल,

 डॉक्टरांचा मनमानी कारभार!

    मेढा (राजेंद्र जाधव) रायगड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय अलिबाग येथे दिव्यांग व्यक्तीसाठी प्रमाणपत्र काढले जातात परंतु येथील डॉक्टरांच्या मनमानी कारभारामुळे दिव्यांग बांधवांची पिळवणूक सुरु असल्याचे दिसून येत आहे.

           शासकीय रुग्णालय अलिबाग येथे दिव्यांग व्यक्तींसाठी अपंगत्वाचे दाखले काढण्यासाठी बुधवार व गुरुवार असे आठवड्यातुन वार दिले असून रायगड जिल्ह्यातील जवळपास महाड, माणगाव,तळा, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, रोहा,अलिबाग, पेण, पनवेल,सुधागड, कर्जत, खालापूर, उरण,अशा सर्व तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती दाखले काढण्यासाठी येत असतात.परंतु कोणतेही ड्रॉक्टर पुर्ण वेळ उपलब्ध नसतात.यामुळे दिव्यांगाचे मोठया प्रमाणात हाल होतांना दिसत आहे.

              याचा प्रत्यय बुधवार दि.५ जानेवारी रोजी दिसून आला. रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील १५० अपंग व्यक्ती प्रमाणपत्राची तारीख संपल्यामुळे रिन्यू करण्यासाठी तर काही जण नवीन दाखले काढण्यासाठ सकाळी ७.०० वाजल्यापासून मिळेल ती गाडी पकडून या शासकीय रुग्णालयात आले होते.सकाळी १० ते २ वाजेपर्यंत सर्वांची तपासणी झाली परंतु दुपारी २ नंतर प्रमाणपत्रावर सही करणारे ड्रॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्याने त्या सर्वांना ताटकळत तिथे कर्मचाऱ्यांनी रांगेत उभे रहायला लावले होते. "येथे होते अपंगांची हेळसांडना"

           पण डॉक्टरांची वेळ ही ३ वाजता असताना देखील डॉक्टर पर्वा संध्याकाळी ६.३० वाजून गेले तरी डॉक्टर आले नाहीत.हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या *अपंग प्रहार क्रांती संघटनेचे सचिव नितीन म्हात्रे यांनी डॉक्टर माने यांना कॉल करून ५ मिनिटांत हजर रहावे अशी विनंती करता लगेच काही मिनिटांत त्याठिकाणी डॉक्टर हजर राहिले व तपासणी आणि प्रमाणपत्र मिळण्याचे काम संध्याकाळी ७.०० वाजता सुरु केले.

        परंतु बरेचशे लांबुन आलेले दिव्यांग बांधव हे कंटाळून प्रमाणपत्र न घेता निघून गेले.आणि यामध्ये काही बांधव व भगिनींची तक्रार होती की हे डॉक्टर आधी दिलेल्या प्रमानपत्रांमध्ये जर ६०% दिलेलं असेल तर आत्ता च्या नवीन प्रमानपत्रांमध्ये ४०%, अथवा त्याही खाली म्हणजे २५% किंवा १२% अशाप्रकारे करून देत होते. पण याचा फायदा ते बांधव कोणत्याही शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी करू शकत नाही.अशा दाखल्यांचे उपयोग काय? यामुळे याकडे संबंधीतांनी लक्ष देऊन योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला वेळेवर व योग्य तेच दाखले उपलब्ध करून द्यावे अशी मागणी अपंग बांधवांकडून केली जात आहे.Comments

Popular posts from this blog