जामगाव येथे मोफत वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन
सुतारवाडी : (हरिश्चंद्र महाडिक)नववर्षाचे औचित्य साधुन जामगाव (ता. रोहा ) येथे मोफत वृत्तपत्र वाचनालयाचे उद्धघाटन जामगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. दर्शना म्हशेळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. नारायण कोदे, रमेश सालस्कर, श्री. मोहनशेठ दोशी, श्री. विवेक लकेश्री, श्री. मंगेश फोफे, श्री. निलेश तवटे, श्री. बबन सालस्कर, श्री. विठ्ठल सालस्कर, श्री. अनंत कोदे, श्री. बळीराम कोदे, वामन शिंदे, श्री. गोपाळ जाधव, श्री. तुळशीराम जाधव, आदि मान्यवर उपस्थित होते.उद्घाटन प्रसंगी सरपंच दर्शना महशेळकर म्हणाल्या या ठिकाणी वृत्तपत्र वाचनालय सुरु केले ही आनंदाची गोष्ट आहे. हे वाचनालय अनेक वृत्तपत्रांनी लवकरच मोठे व्हावे येथील विविध वर्तमान पत्रांचे वाचन दररोज सर्वानी करावे आणि घडामोडींची माहिती घेवून आपल्या ज्ञानात भर पाडावी असे मत व्यक्त केले.
वृत्तपत्र वाचनालय प्रमुख श्री. रमेश सालस्कर यांनी प्रास्तविक करताना सांगितले सध्या मोबाईल मुळे वाचकांची गोडी कमी झाली आहे. मोबाईलचे जसे फायदे आहेत त्या पेक्षा तोटे मोठ्या प्रमाणावर आहेत. पालकांनी लहान मुलांना मोबाइल न देता त्यांना वाचनाची गोडी निर्माण करणे हे हिताचे असून येथील वृत्तपत्राचे नियमितपणे वाचन करावे असे आवाहन श्री. रमेश सालस्कर यांनी केले.
सध्या येथील वृत्तपत्र वाचनालयात दैनिक रायगड टाइम्स, दैनिक लोकमत, दैनिक नवाकाळ, दैनिक कृषीवल हे वर्तमानपत्र नागरिकांना वाचण्यास उपलब्ध आहेत. रमेश सालस्कर आणि त्यांच्या मित्रपरिवाराने सुरू केलेल्या या वृत्तपत्र वाचनालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment