रोहा किल्ला येथे मोफत आरोग्य शिबिराला रुग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद!

200 रुग्णांची तपासणी तर 11 रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया,
किल्ला-रोहा (महेश बामुगडे) रोहा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे झुंझार कार्यकर्ते किल्ला ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच कै.राजेंद्र प.बामुगडे, ज्येष्ठ मार्गदर्शक कै.ह.भ.प.मारूती महाराज नाकटे,कै.नामदेव जमदाडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरुळ तसेच दीपक जमदाडे यांच्या संयुक्त विद्यमाने व किल्ला ग्रामस्थ यांच्या सहकार्याने किल्ला येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात दोनशेहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करत औषधोपचार करण्यात आले असून अकरा रुग्णावर मोती बिंदू शस्त्रक्रिया होणार आहे तर प्रसंगी या शिबिरात अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी शिबीराचे फित कापून उदघाटन करताना पक्षाचे जिल्हाकार्याध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाकार्यध्यक्ष व रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समीचे सल्लागार मधुकरशेठ पाटील यांच्या शुभहस्ते या शिबिराचे शुभारंभ करण्यात आले यावेळी उपस्थितीत प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे ,तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर, पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष शंकरराव भगत,जिल्हा सरचिटणीस व ओबीसी संघर्स समन्वय समिती जनमोर्चा रोहा तालुकाध्यक्ष सुरेश मगर,वरसे सरपंच नरेशजी पाटील,रामाशेठ म्हात्रे,अमितजी मोहिते,आदी ग्रामस्थ व युवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न करण्यात आलेल्या या शिबीरात मधूकरशेठ पाटील,विजयराव मोरे ,सुरेश मगर,शंकरराव भगत,व उपस्थित डॉक्टर यांनी उपस्थित रुग्णांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच तेरणा हॉस्पिटल च्या टीमने प्रसंगी सर्व रुग्णांची विविध आजारांची तपासणी करून त्याना मोफत औषधोपचार करण्यात आले.तर रुग्णावर मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog