ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथे महिला सक्षमीकरण!
मुलांना शिक्षण तर मातांना उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण
कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील खांब येथील ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे एक्सल इंडस्ट्रीज लिमिटेड व श्री विवेकानंद रिचर्स आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा तसेच महाराष्ट्र शासन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने खांब विभागातील महिलांना सक्षमीकरनाच्या माध्यमातून विविध प्रकाच्या मसाल्याचे शनिवार आणि रविवार दोन दिवसाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले सदरच्या प्रशिक्षनात बहुसंख्ये महिलांनी सहभाग नोंदवला होता .
तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी शिक्षणाबरोबरच विद्यार्थी वर्गाच्या मातांना व कुटूंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला सक्षमीकरनाच्या माध्यमातून खांब येथील ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल चे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे व मुख्याध्यापिका सौ रिया लोखंडे यांच्या संकल्पनेतून रोहा औद्योगिक क्षेत्रातील एक्सल कंपनी व श्री विवेकानंद रिसर्ज आणि ट्रेंनिग दमखाडी रोहा यांच्या पुढाकाराने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हाशीराम ग. मंचेकर (Excel ind. HR & Admn.Head ) व सुशिल चं. रुळेकर ( Excel Ind CSR Head & VRTI Trust - रोहा प्रमुख ) प्रशिक्षण देणाऱ्या सौ मोरे ,व सौ घोसाळकर , संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लोखंडे,मुख्याध्यापिका सौ रिया लोखंडे,डॉ श्याम लोखंडे ,गोविंद वाटावे,अनिल महाडिक,सौ स्वाती महाडिक,डॉ मंगेश सानप,रविंद्र मरवडे,शशिकांत मरवडे,नंदू कळमकर,अलंकार खांडेकर,विश्वास निकम ,आदी प्रशिक्षणार्थी महिला वर्ग उपस्थित होते .
सदर आयोजित केलेल्या खांब यथील ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूलचा उपक्रम व महिला सक्षमीकरण प्रशिक्षण व मसाले बनविण्याचे प्रशिक्षणाला आंबेवाडी मतदारसंघ रोहा पंचायत समितीच्या सदस्या सौ सिद्धीताई संजय राजीवले यांनी सदिच्छा व शुभेच्छा भेट देत प्रशिक्षणात सहभाग घेतलेल्या महिलांचे आवर्जून कौतुक केले तर येथील ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल यांनी मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या मातांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी दोन दिवसांच्या मसाले बविण्याचे प्रशिक्षण देत असल्याचा एक आनंद व्यक्त केला तसेच सर्व महिलांनी एकत्रीत येऊन कुटिरोद्योग व विविध उद्योग व्यवसायात महिला वर्गानी पुढाकार घेतला पाहिजे तुम्ही बनवून दिलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्याचे काम केले जाणार आहे एक्सल कंपनी राबवत असलेला उपक्रम व त्यातून निर्माण होणारा महिला सक्षमीकरण हे कुटूंबाला आर्थिक बळ देणारे ठरणार असल्याचे सांगितले .
तसेच रोहा तालुका मुख्यकृषिधिकारी महादेव करे यांनी सक्षमीकरणात सहभागी झालेल्या महिलांना मार्गदर्शन करतांना सांगितले की तळागाळातील महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लालून आर्थिकदृष्ट्या सक्षम बना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या एकत्रित येऊन स्वयंरोजगार निर्माण करा गृह उद्योक व्यवसायाची निर्मितीसाठी शासनाची मदत घेऊन आपला कुटूंब आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे सांगत महादेव करे यांच्या शुभहस्ते सहभागी प्रशिक्षित महिलांना महाराष्ट्र शासन मान्य प्रशिस्ती प्रमाणपत्राचे वाटप यावेळी करण्यात आले ,
Comments
Post a Comment