वीर हनुमान तिसे येथील कबड्डी स्पर्धेत महाड संघ विजेता, तर गोवे संघ उपविजेता,

         गोवे-कोलाड( विश्वास निकम) वीर हनुमान युवक मंडळ, गिरोबा मित्र मंडळ, तसेच ग्रामस्थ मंडळ तिसे यांच्या वतीने शनिवार दि.११ डिसेंबर व रविवार दि.१२ डिसेंबर २०२१ रोजी ५० किलो वजनी गटाचे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या खेळविण्यात आलेल्या अटीटतीच्या कबड्डी स्पर्धेत ओवी स्पोर्ट्स महाड संघाने सोमजाई गोवे संघावर विजय संपादन करून विजेतेपद पटकावले.तर गोवे संघाने उपविजेते पटकावले.

             तिसे येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील संघांनी भाग घेतला होता या स्पर्धेत गावदेवी बाहे संघ तृतीय तर भैरवनाथ मालसई संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी संघ ठरला तर सोमजाई गोवे संघाचा प्रवीण गायकवाड याला उत्कृष्ट पक्कड तर उत्कृष्ट चढाई भैरवनाथ मालसई संघाचा ओंकार तेलंगे याला देण्यात आले तर सामनावीराचा 'किताब ओवी स्पोर्ट्स महाड संघाच्या आदित्य शिंदे याला देण्यात आला.

       यावेळी तिसे ग्रामपंचायत सरपंच राकेश कांबळे, सदस्य महेश पवार, माजी सरपंच दगडू शिगवण, मुख्यध्यापक नितीन गोरीवले, विनोद कदम, विजय शिगवण , नरेश बिरगावले, नागेश गोरीवले, मंगेश बिरगावले,असंख्य खेळाडू व प्रेक्षक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog