वेषांतर करून लोकांच्या मनोरंजनासाठी सोंग करणारी व्यक्ती  बहुरुपींचा प्रवास सुरु!

वाई -सातारा तेथील बहुरूपी अरुण शिंदे कोलाड मध्ये  दाखल, 

  सुतारवाडी (हरिश्चंद्र महाडिक) महाराष्ट्रातील लोक कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे बहुरूपी, पूर्वीच्या  काळी जेव्हा ही कलाकार कुणाचातरी हुबेहुब नक्कल करून लोकांचे मनोरंजन करत असत.  समर्थ रामदासांनी त्यांच्या भारुडात " खेळतो एकला बहुरूपी रे! पाहता अत्यंत साक्षेपी रे! सो गो  धरिता नानापरी रे! बहुतचि कलाकुसरी रे!"असा उल्लेख केला आहे.  एक  पूर्वी बहुरूपी सोंग घेवून गावो गावी जावून नागरिकांची करमणूक करायचे. या बदल्यात स्वखुशीने त्यांना एक रुपया मिळायचा तो ते आनंदाने घ्यायचे. आताचे बहुरूपी मनोरंजन न करता पोलीसांचा गणवेश घालून ठिक ठिकाणी जाऊन शब्दांचा भडीमार करून नंतर आपण बहुरूपी असल्याचे सांगून पैसे घेवून समाधानाने दुसरीकडे जातात. पूर्वी त्यांना एक रुपया मिळायचा आता दहा, विस रुपये दिले जातात. दिवसभर एका तालुक्यात गेला तर त्याची कमाई एक हजाराच्या पेक्षा जास्त असते. 

        वाई - सातारा येथील बहुरूपी अरुण शिंदे यांनी सांगितले गेल्या वर्षीं कोरोनामुळे मी रायगड जिल्हयात येऊ शकलो नाही. यावर्षी रोहा तालुक्यात आलो असून कोलाड तसेच तालुक्यात मला चांगला प्रतिसाद नागरिक देत आहेत. मी रायगड जिल्हयात गेल्या तीन वर्षापासून येत आहे. बिन पगारी फुल अधिकारी म्हणून मी सध्या ठिक ठिकाणी फिरतोय पुर्वी पोलीसांचे कपडे घालून फिरलो की मुल तसेच माणसे घाबरायची. आता मात्र सर्वांची भिती गेली आहे.Comments

Popular posts from this blog