चिल्हे येथील शारदा भालेकर यांचे निधन,
कै. शारदा भालेकर |
कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागातील महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे सेवा निवृत्त कर्मचारी गुणाजी भालेकर यांच्या पत्नी सौ शारदा भालेकर यांचे बुधवार दि.२ डिसेंबर २०२१ रोजी अल्पशा आजाराने दुःखद तीव्र निधन झाले आहे . मृत्यू समयी त्या ७५ वर्षांच्या होत्या.
शारदाबाई ह्या मोठया कुटूंबातील अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वाना सुपरिचित होत्या शेती व्यवसायात अत्यन्त मेहनती आणि कष्टकरी भात शेती लागवडी बरोबरच कडधान्य पीक कुकुट पालन .आधुनिक काळात बहुतेक ठिकाणी एकत्र कुटुंब दिसून येत नसले तरी अद्यापही त्यांचे एकत्रित कुटूंबात राहत होत्या.सर्व मुलांना उच्च शिक्षण दिले त्यांच्या आकस्मित निधनामुळे भालेकर कुटूंबावर दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी वरसगाव, आंबेवाडी, कोलाड,डोळवहाल खांब,देवकान्हे ,रोहा,लांढर बोरघर, वाशी, इंदापूर, माणगाव,मुबंई इत्यादी विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर व समस्त चिल्हे व वरसगाव ग्रामस्थ उपस्थित होते त्यांच्या पश्चात त्यांचे पती,एक मुलगा, चार मुली,जावई,सून,दिर,जाऊबाई,पुतणे, पुतण्या,नातवंडे व मोठा भालेकर परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी व उत्तर कार्य शुक्रवारी दि.१० डिसेंबर रोजी मौजे चिल्हे येथील त्यांच्या निवासस्थानी संपन्न होत असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांकडून प्राप्त झाली आहे.
Comments
Post a Comment