ऐनघर विभाग बेरोजगार संघटनेचे उपाध्यक्ष तथा बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेचे संचालक सतीश नारायण सुटे यांना पितृशोक!
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै.नारायण सुटे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ!
गोफण (रघुनाथ कडू) ९ डिसेंबर २०२१रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या सुकेळी गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच आमदार रविंद्रशेट पाटील यांचे खंदे समर्थक मानले जाणारे नारायण आबा सुटे यांचे शनिवार रोजी दुपारी 12.च्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयांत उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले निधनासमयी त्यांचे वय ६५ होते.
कै.नारायण सुटे यांचे जेष्ठ चिरंजीव सतीश सुटे यांना पितृ शोक झाले असून ते आपल्या वडिलांच्या पाउलवाटेवर ते देखील सामाजिक कार्याचा वारसा चालवत असल्याने ते ऐनघर विभाग बेरोजगार संघटनेचे उपाध्यक्ष तथा बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेचे संचालक म्हणून काम करतआहेत.आपल्या कर्तुत्वात वडिलांचा हस्त हरपल्याने त्यांना दुःख अनावर झाले आहे.कै.नारायण सुटेंच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. असून त्यांचे कार्य नावाजण्याजोग असुन सामाजिक, सांस्कृतिक,अध्यात्मिक, क्रीडा कला व राजकीय क्षेत्रातील लोक ओळख असलेल्या व्यक्ती महत्वाने त्यांच्या सबंधीत क्षेत्रातील मंडळी कित्येकजण कुटूबीयांचे सांत्वनासाठी सुकेळी या गावी आल्याचे कळते.यातच दिनांक ८डिसेंबर रोजी पेण सुधागड मतदार संघाचे सन्माननीय आमदार श्री रवींद्रशेट पाटील साहेब व त्यांच्या समवेत विभागातील कार्यकर्ते, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट काशिनाथ ठाकूर , बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजयजी पाशीलकर , तसेच कार्याध्यक्ष रघुनाथ कडू तथा माहिती अधिकार महा संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष, बळीराजा शे.सं.जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी मुटके, खजिनदार दगडू बामुगडे, जिल्हा महिला अध्यक्षा प्रियांकाताई कांबळे, नागोठणे विभाग अध्यक्ष दिनेश कातकरी, चणेरा विभाग अध्यक्ष गजानन सकपाळ,रोहा शहर उपाध्यक्ष नामदेवराव धोत्रे, संचालक अनिल लाड, बेरोजगार संघटनेचे पदाधिकारी धर्मेंद्र सिद,ऐनघर ग्रामपंचायत सरपंच यांचे पती राजेंद्र कोकले, उपसरपंच रोहिदास भाई लाड, सदस्य विठ्ठल इंदुलकर प्रकाश ढोबले, किशोर नावले, जितेंद्र धामणसे, नामदेव वाघमारे, नारायण मोहिते,व जेष्ठ नागरिक ह.भ.प.मगरकाका या सर्वांनी सुटे कुटुंबीयांचे त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले.कै.नारायण आबा सुटे यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुलगे व मुलगी जावई नातवंडे असा मोठा मित्रपरिवार असुन कै.सुटे यांचे दशक्रिया विधी सोमवार दिनांक१३डिसेंबर तर अंतिम विधी (उत्तरकार्य) १६डिसेंबर रोजी रहात्या घरी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
Comments
Post a Comment