प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडीत ३२६५४ जणांनी घेतली कोरोना लस, डोस घेण्यासाठी आवाहन!


कोलाड (श्याम लोखंडे ) संपूर्ण जभरात कोरोना संसर्ग देशात व राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना लस देण्यास सुरुवात करून रोहा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी कोलाड येथे आजपर्यंत कोलाड विभागातील विविध परिसरातील ३२६५४ नागरिकांनी कोरोना वर मात करण्यासाठी ही लस घेतली असल्याची माहिती आरोग्य केंद्रातुन मिळाली आहे.

कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी अथवा त्याची चैन तोडण्यासाठी शासनाच्या विविध योजना प्रशासकीय यंत्रणा राबवित आहेत तसेच तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात कडून मिळालेल्या माहीत येथील केंद्रात एकूण ३२६५४ डोस दिले गेले आहेत या पैकी २२९०० पहिले तर ९७५४ दुसरे डोस दिले गेले असून येथे आता वेळोवेळी लसीची उपलब्धता होत आहे त्यामुळे नागरिकानी कोरोना लसीच्या दुसऱ्या डोस पासून वंचीत राहू नये यासाठी कोलाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वरिष्ठ अधिकारी डॉ वाघ,डॉ तिवडे, डॉ दर्शना वरूठे,तसेच सेविका सोनाली जांबळे यांनी आवाहन केले जात आहे.

सुरवातीच्या काळात लसीचा तुटवडा होता परंतु आता कोणतीही गडबड गोंधळ न होता येथील आरोग्य केंद्रात लसीकरण होत आहे तसेच वेळोवेळी जिल्हा आरोग्य केंद्राकडून लसीचा पुरवठा होत असल्याने नागरिकांना लस वेळेवर दिली जात असल्याचा समाधान व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog