रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानचे पाचवा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात झाला संपन्न!

 देशाचा अन्नदाता शेतकरी सुखी!तर संपूर्ण देश सुखी!

 प्रगतिशील शेतकऱ्यांचा केला गुणगौरव!

शेतकऱ्यांनी सुद्धा रोजच्या दिनक्रमाचे कॅलेंडर तयार करावे तरच आजच्या वर्धापन दिनाचे सार्थक ठरेल:-उज्वलाजी बानखेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड यांचे प्रतिपादन!

रोहा -गोफण  (रघुनाथ कडू) रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानचे पाचवा वर्धापनदिन चंपाषष्ठी च्या शुभ मुहूर्तावर गुरुवार दिनांक ९डिसेंबर २०२१ रोजी रोहा येथील सां.बा.खात्याचे गेस्ट हाऊसमध्ये साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या सोहळ्यानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून उज्वलाजी बानखेले मॅडम (जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रायगड)डाॅ.विवेकजी वर्तक (मत्स्य शास्त्रज्ञ खार जमीन संशोधन केंद्र)श्री.मनोजजी तलाठी (कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र किल्ला)श्रीअधिकारी.राहुलजी जोशी (पंतप्रधान अन्न व मत्स्य प्रक्रिया योजना मार्गदर्शन)अमोल सुतार (तालुका कृषी अधिकारी)यांचे मोलाचे मार्गदर्शन  लाभले.तरआमंत्रित पाहुणे म्हणून संजयजी पाशिलकर (बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष)प्रियांका संभाजी कांबळे बळीराजा महिला जिल्हा अध्यक्ष)

नामदेव भोपी (अध्यक्ष दिव भुमिपूत्र शेतकरी संघटना)मंजुळा गोतरकर (भारत विकास संगम संघटक माणगाव रायगड)

तसेच प्रगतशील महिला व शेतकरी आणि डि.आर.घटकांबळे वस्तीगृहातील विद्यार्थी रोहा.यांची कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती.

कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत करुन मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.तसेच मान्यवरांचे शाळश्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ अर्पण करून सन्मानित करण्यात आले.सुत्रसंचलन प्रतिष्ठानचे संचालक श्री पानसरे सर यांनी केले तर प्रतिष्ठानचे सचिव श्री पांडुरंग भेरे सर यांनी प्रास्ताविक भाषणात गेले पाच वर्षाच्या कार्याच्या कालखंडाचा आराखडा मांडतांना पावने दोन वर्षे कोविड१९ या माहामारीत देखील शेतकऱ्यांना प्रतिष्ठाने केलेल्या व्यावसायिक सल्हाची व सक्रिय कार्याची आठवण करून दिली.त्या नंतर मान्यवरांचे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभले.शेतकऱ्यांनी मुलांना नोकरी व्यवसायत न अडकवता आपल्या शेतीविषयक आवड निर्माण करावी.शेती ही एक अशी बॅंक आहे की जगात ईतका मुनाफा कुठची अर्थ व्यवस्था देणार नाही इतकी शेती देते हे मक्याच्या कणसाचे उदाहरण देऊन स्पष्ट केले की एक ते दोन दाण्यात तिनसे पासष्ट दाणे आपल्याला शेतीत पेरल्या नंतर मिळतात हे तलाठी सरांनी आपले विचार मांडतांना सांगितले.तर वर्तक सरांनी इंटरनेटवरील बिजनेस हे फसवे आहे कोणीही शेतकरी वरगाला फसवेल असे युट्यूब वा मोबाईल अॅपचे पाहुन व्यवसायात फसु नका तर आपल्याकडे पिकते व त्याचे कसे सुशोभित मार्केटिंग करता येईल हे मच्छिचे उदाहरण देऊन समजावले.तर त्याच धर्तीवर राहुल सर यांनी डायफ्रुड अन्न प्रक्रिया या नवीन नवीन योजना राबविण्यात यावी अश्या योजनेस पाहिजे ते सहकार्य आमच्या कडून करता येईल ते करु असा मोलाचा सल्ला दिला.तालुका कृषी सहाय्यक यांनी सांगितले की आमच्या सल्हाने शेतकऱ्यांने काम केले तर आपली मेहनत वाया न जाता फळीत ठरेल त्या करीता आमचा पुर्ण स्टाप हा आपल्या सहकार्यास हजर असेल असे अभिवचन दिले.




रायगड जिल्हा कृषी अधिकारी सौ.उज्वला बानखेले यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात अतिशय सुंदर असे सोन्याच्या खानी चे उदाहरण देऊन शेतकऱ्याची मने प्रफुल्लित केली.

त्यांनी आपले विचार मांडतांना सांगितले की सोनाराला आपण घडवणीचे कलेचे पैसे देतो. तर आपण त्याच्या कलेचे मोल देतो ना मगया पुढे आपल्या्कडे ही सोन आहे तर तर आपल्याला ओळखता आले पाहिजे.

आपण चांगले कारागीर सुद्धा आहोत मग आता ते आपणच घडवायचे तरच त्याचा मोल हा आपल्याला घेता येईल.

 आपल्या कार्यक्रमात कॅलेंडर वाटप केले जाणार असल्याचे कळते तर आपण वर्षाची आठवण जशी कॅलेंडरमधील मधील तारखांनी करुन देणार तशी माझ्या मते स्वता शेतकऱ्यांनी रोजच्या दिनक्रमाचे नियोजन ठेवावे. हिशोब हे असले पाहिजे.जसे कुठलाही व्यापारी हा डायरी स्वरुपात त्याच्या व्यवहाराचा हिशोब ठेवतो .मग शेतकऱ्यांच्या कामाचा का नको.

तो तर राजा आहे तर आपण आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून आजपासूनच संकल्प करावे, की मी रोज नियोजन बद्ध काम करेन. आणि असे केले तरच आजच्या सोहळ्याचे सार्थक ठरेल.असे बोलुन दाखवले या नंतर नवनिर्वाचित प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेशजी भगत साहेबांनी तर आपल्या भाषणात सांगितले की प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद जरी माझे नावे असले तरी त्याचे मानकरी हे माझे सर्व कार्यक्षेत्रातील मंडळी आहेत असे मी मानतो.तर माझ्या कडून शेतकरी बंधू भगिनींना जितकं जास्तीत जास्त कार्य व वेळ देण्याचे काम हे मी प्रामाणिकपणे करणार अशी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

 मत्स्य प्रक्रिया योजना राबविण्यासाठी जवळ जवळ नव्याने चाळीस शेतकरी भाग घेणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले व लवकरच आपण ही संकल्पना पुर्ण करण्याचे वचन देतो आहे असे बोलून उपस्थित मान्यवर व शेतकरी बंधू भगिनींना धन्यवाद दिले.

या वेळी प्रगतशील शेतकऱ्यांना सन्मान गौरविण्यात आले...

*सत्कार मूर्ती...*

१)सौ.कांचन प्रकाश पवार.वाशी  कलिंगडगड शेती,२) वैशाली राजेश चव्हाण.बाहे,भाजीपाला.३)रुपाली राम देवकर.बाहे,भाजीपाला.४)सौ.दिपाली हिरु धामणसे.लांडर,कलिंगड.५)गौरी किशोर चितळे.मेढा, पोल्ट्री ६)ताई प्रकाश लांबोरे.गोपाळवट,फळबाग.७)शेवंता अनंत वाघमारे.कोकबन, फळबाग.८)सौ.भारती सखाराम शिंगाडे.तांबडी,दुग्ध व्यवसाय.९)श्री.सुरज सुरेश भगत.लांडर,कलिंगड.१०)श्री.मनिष उमाकांत जांभेकर,आमडोशी.गांडुळखत.११)श्री विवेकानंद भवानजी पोटे.तांबडी, दुग्ध व्यवसाय.१२)श्री.एकनाथ वाडकर.पोल्ट्री व्यवसाय.१३) विलास म्हात्रे.भागिर्थिखार.शेततळे.१४)एजाज धनसे.खैरेखुर्द.अंबा बागायत.१५)निशांत पाटील.शेंद्रीय शेती.१६)श्री अतुल पाटील सर.कोकबन.हळद लागवड.१७)विजय वसंत दिवकर.यशवंतखार.आंबा,हळद.या सर्वांना सन्मानित करण्यात आले तर दहा ते बारा ,वसतीगृह रोहा शाळेतील विद्यार्थांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.

या नंतर दिवकर मॅडम यांनी सन्मानित शेतकऱ्यांकरीता. एक सुंदर असे प्रापंचिक गृहिणी वरुन गित गायले.त्यानंतर सर्वांचे आभार प्रतिष्ठानचे संचालक व उच्च शिक्षित प्रगतशील शेतकरी संतोजी दिवकर यांनी शब्द सुमनाने व्यक्त केले.अश्याप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog