स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांच्या देवदर्शन सहलीचे आयोजन!

    गोवे-कोलाड (विश्वास निकम) स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांनी देवदर्शन सहल मंगळवार दि.२१/१२/२०२१ रोजी सकाळी ६.०० वाजता मुगवली गणपती, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, सोमजाई मंदिर, दिवेआगार येथील सोन्याचा गणपती अशी एकदिवशीय सहल आयोजित करण्यात आली आहे.

   यासाठी प्रत्येकी ५०० रुपये वसुली असून आपली वर्गणी श्री.मारुती राऊत अध्यक्ष (मो.९१५८६९७१७७६)यांच्याकडे दि.१०/१२/२०२१ पूर्वी जमा करावी. पहिल्या दहा सीट राखीव असून उर्वरित ११ते ४९ नंबर सीट जो प्रथम सर्व वर्गणी देईल त्यांची क्रमांकानुसार बसण्याची व्यवस्था करण्यात येईल सहलीसाठी प्रत्येकाने आपला जेवणाचा डब्बा व पाणी सोबत घ्यावे. आयोजकांकडून एकवेळ नास्ता व चहा देण्यात येईल. तरी लवकरच लवकर वर्गणी देऊन सहलीत सहभागी व्हावे. व सहलीला जाण्यासाठी कोलाड येथे ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे सर्वांनी वेळेवर एकत्र जमावे अशी विनंती ज्येष्ठ नागरिक कोलाडचे अध्यक्ष मारुती राऊत, सचिव अशोक कदम व सर्व संचालक मंडळ यांच्या कडून करण्यात येत आहे.


Comments

Popular posts from this blog