रायगड जिल्ह्यातून लाखो भक्त पंढरपूरला रवाना जागोजागी पायी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत!
सुतारवाडी येथे दिंडी आल्यानंतर ती दिंडी दत्तमंदिरामध्ये एक दिवस वास्तव्यास होती. यावेळी येथील ग्रामस्थांनी दिंडीतील भक्तगणांची उत्तम प्रकारे व्यवस्था केली होती. या पायी दिंडीत मनोहर साळवी, मोहनशेट दोशी, माणिकराव सावंत तसेच अन्य भक्तगण सहभागी होऊन पंढरपूर कडे रवाना झाले.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे अनेक भक्तांची आळंदी पंढरपूरची वारी चुकली होती. लाखो भक्तांना परमेश्वराचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे लाखो भक्तांची निराशा झाली होती. या वर्षी मात्र अनेक ठिकाणी कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे पुन्हा भक्तीभावाने लाखो भक्तगण आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरला गेले आहेत. त्या ठिकाणी लाखो भक्तांच्या समवेत विठुरायाचा गजर सुरु आहे. लवकरच विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर पायी गेलेल्या भाविकांच्या दिंड्या परतीचा प्रवास करणार आहेत.
Comments
Post a Comment