सुतारवाडी (हरिश्चंद्र महाडिक) कोलाड नाक्यावर गुळाच्या चहाला चांगली मागणी असून वाघमारे यांनी सुरू केलेला या गुळाच्या चहाची चव लज्जतदार असून याचे फायदे ही चांगले आहेत. क्षण आनंदाचा आणि चहा गुळाचा हे सांगताना वाघमारे यांनी सांगितले की, या गुळाच्या चहाचे अनेक फायदे आहेत. गुळामध्ये आयर्न, पोटॅशिअम असल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. गुळ हे अॅन्टीटॉक्सीन म्हणून काम करते. तसेच शरीरातील हानिकारक टॉक्सीन बाहेर काढून त्वचा चमकदार बनविण्यास मदत होते. गुळाच्या चहामुळे उतार वयातील समस्या दूर होण्यास मदत होते. संधी वातावर अत्यंत गुणकारी आहे. पचन क्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच थकवा दूर होतो. गुळामध्ये शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणारे घटक अधिक प्रमाणावर असतात. केसांविषयी आणि त्वचेविषयी समस्या दूर होण्यास उपयुक्त आहे. चवी बरोबर हा आरोग्यदायी चहा गुणकारी असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
छायाचित्र:- हरिश्चंद्र महाडिक सुतारवाडी |
Khupach sundar chavista n arogya dai chay aahe hi
ReplyDeleteThank you Saheb 🙏
ReplyDelete