तळा तालुका पत्रकार संघाची नव्याने स्थापना!

अध्यक्षपदी कृष्णा भोसले तर सचिव पदी श्रीकांत नांदगावकर यांची निवड,

 सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव!






तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यात तळा तालुका पत्रकार संघाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे.. या संघटनेच्या अध्यक्षपदी पत्रकार कृष्णा भोसले तर सचिवपदी श्रीकांत नांदगावकर  तर कार्याध्यक्षपदी पत्रकार संध्या पिंगळे, तर सदस्य म्हणून संतोष जाधव व सुरज पुरारकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सोनसडे येथील कालभैरव सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. 

     तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न, गोरगरीब डोंगरदाऱ्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या समस्या, याबाबत वाचा फोडणे, शासकीय स्तरावर नागरीकांची कामे वेळेत व्हावीत.यासाठी लक्ष केंद्रित करणे.तालुक्यात सामाजिक उपक्रम राबविणे, संघटनेचे पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन एकमेकांत संवाद साधत संघटनेला बळकटी देणे याविषयावर भर देण्यात आला.याचबरोबर विविध छोटे-मोठे उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणे.अशा विषयावर चर्चा करण्यात आली

यावेळी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष कृष्णा भोसले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की तळा तालुका पत्रकार संघ हा सामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी लढणार असून तालुक्यातील रस्ते,पाणी व विविध समस्या अशा  आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून जनसामान्यांच्या प्रश्र्नांची उकल करण्यासाठी पत्रकारांनी लक्ष देणे गरजेचे आहे.आपण मला नव्याने स्थापन झालेल्या पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog