तळा येथे राष्ट्रीय पिछड़ा वर्ग (ओ.बी.सी.)मोर्चा  संपन्न

तळा (कृष्णा भोसले)तळा तालुक्यात राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी)मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ११वाजता नागरिक यासाठी मोठ्या संख्येने जमा झाले होते. तळा तळेगाव रोड मार्गे हा मोर्चा निघाला शहरात बळीचा नाका येथे मोर्चा चे वतीने जितेंद्र भोसले यांनी उपस्थीत नागरिकांना मार्गदर्शन केले.त्यांनी कृषी कायदे विषयक माहिती दिली, ओबीसी चीं जातीनिहाय जनगणना,केंद्र सरकार व्दारा जाती आधारीत जनगणना आणि ओबीसींची जातिआधारीत जन-गणना करण्यास नकार दिल्याबद्दल, तीन कृषी कायदे आणि ईव्हीएमच्या विरोधात..  राष्ट्रीय ओबीसी (पिछडा-वर्ग) मोर्चाद्वारे टप्प्याटप्प्याने देशव्यापी चरणबद्ध आंदोलन खालील प्रमाने केले जात आहे. तरी या मोर्चामध्ये ओबीसी मधील संघटनांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी बांधवांनी एकत्र येऊन या राष्ट्रव्यापी संघटनेच्या सोबत एकत्र येऊन लढत आहोत.

चौथा टप्पा२५ नोव्हेंबर २०२१ भारतातील ३१ राज्यांच्या ५५० जिल्ह्यांमध्ये ५,००० तालुक्यात होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तळा तहसीलमध्ये सकाळी १२वाजता रॅली प्रदर्शन आयोजित केले होते.
 तालुक्यातील ओबीसी बांधवांना,संघटनांना त्यांच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांना तसेच इतर सर्व बहुजन समाजातील सहयोगी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, बहुजन क्रांती मोर्चा, मौर्य क्रांती संघ चे कार्यकर्ते,SC ST NT DNT VJNT SBC MBC, मुस्लीम,शीख,बौद्ध, जैन बांधवांनी या रॅली साठी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक ताकद निर्माण करून समस्यांचे समाधान करण्यासाठी आपण  उपस्थित राहीलो आहाता असे  संयोजक राम सावंत यांनी सांगितले.

     शहरातील मुख्य चौकातुन हा मोर्चा तहसिलकार्यालयाकडे रवाना झाला.यामध्ये तालुक्यातील अनेक बांधव बंधु भगिनी मोठ्या संख्येने तहसिलदार यांचेकडे आपल्यामागण्यांचे निवेदन त्यांनी सादर केले.   यावेळी राम सावंत, मंगेश पारावे, जितेंद्र भोसले , प्रदिप ठोंबरे, संतोष पोटले, रमेश पाखड, रमेश भोरावकर, संतोष शिनगारे आणि महीला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       

Comments

Popular posts from this blog