रा.जि.प.शाळा विहुले कोंड येथे विदयार्थ्यांना  शालेय उपयोगी साहित्य वाटप!

   माणगाव (प्रतिनिधी) रा. जि.प.शाळा विहूले कोंड ता. माणगाव येथे शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी UNISEF ,CACR Foundation Mumbai व हरित ग्राम सेवा संस्था महाड यांच्या सहकार्याने इ.१ली ते ७ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या परिसरातील रा. जि. प. शाळा विहुले कोंड, डोंगरोली वरची वाडी , डोंगरोली खालची वाडी, बौद्ध वाडी, विहूले , महादपोली, व महादपोली आदीवासीवाडी, या शाळेतील १५४ विद्यार्थ्यांना शालेय दफ्तर व विविध प्रकारच्या अनेक खेळाचे साहित्य श्री विनोद लाड सर ( अभिनव ज्ञान मंदिर उसर खर्द) यांच्या विशेष प्रयत्नातून व श्री राजेन्द्र कडू सर अध्यक्ष हरित ग्राम सेवा संस्था श्री सुशिल कदम सर यांच्या सहकार्याने वाटप करण्यात आले.यावेळी CACR चे श्री नितीन वाढवाणी सर , सौ पालकर मॅडम गटशिक्षणाधिकारी माणगाव तालुका, श्री सुजित शिंदे सभापती माणगाव, श्री शैलेश भोनकर सदस्य पंचायत समिती, श्री गजानन अधिकारी माजी सभापती माणगाव , श्री सावंत सरपंच विहुले कोंड , श्री विश्वास मौले सर्व मुख्याध्यापक , शिक्षक , पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सुरेल स्वागतगीत व संविधान प्रास्थाविक गायनाने झाली.श्री वाढवाणी सर यांनी आपण दररोज हात स्वच्छ धुवावेत तसेच नियमित अभ्यास करावा.आरोग्याची काळजी घ्यावी याविषयी माहिती सांगितली.मा.पालकर मॅडम यांनी हे दफ्तर म्हणजे मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी चांगला उपयोग होईल व उत्साह वाढणार आहे पालकांनी माझी शाळा समजावी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.वाटप झाल्याने विद्यार्थी व पालक यांच्या उत्साह व चैतन्य निर्माण झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री चिपळूणकर सर मुख्याध्यापक विहुले कोंड, सुत्रसंचलन श्री कांबळे सर व आभार श्री विहुलेकर सर यांनी केले.सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक ,ग्रामस्थ वर्गाकडून श्री विनोद लाड सर यांना धन्यवाद व्यक्त केले.


Comments

Popular posts from this blog