रोह्यात पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आरोपीस अटक, घटनेबाबत एकच संताप,


कोलाड (श्याम लोखंडे) माणुसकीला काळीमा फासणारी घटना रोहा तालुक्यात पुन्हा रविवारी घडली. 5 वर्षाच्या बालिकेवर 36 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली व याबाबत सर्वत्र एकच संताप व्यक्त केला जात आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की रविवारी सायंकाळी आरोपी राकेश शिर्के याने अल्पवयीन मुलीला घरी नेवून लैंगिक अत्याचार केले, आरोपीला पोलिसांनी रात्री उशीरा अटक केल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली.

            रोहा तालुक्यात पुन्हा लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अत्याचाराचे सत्र सुरु असतानाच रविवारी सायंकाळी रोहा शहरातील पार्टे चाळीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली. सायंकाळी 6 च्या सुमारास अंगणात खेळत असणारी लहान मुलगी खेळता-खेळता ती अचानक बेपत्ता झाल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्या मुलीचा आजी-आजोबांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी नराधम राकेश शिर्के वय 36 याने लहानगीला स्वतःच्या  घरी नेवून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. चाळीचे मालक चंद्रकांत पार्टे यांनी पोलिसात याबाबतची फिर्याद दाखल केली. आरोपीने सबंधीत मुलीवर अत्याचार केला. ही माहिती पोलिसांना समजताच आरोपीने पळ काढला. परंतु फिर्यादीच्या म्हणण्यावरुन सदर आरोपी राकेश शिर्के याच्या विरुद्ध 376, 378(2)(आय)(आय), 376 (3), 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तदनंतर आरोपीला रोहा पोलिसांनी तातडीने अटक केली.असून अधिक तपास पेण उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही.व्ही. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक तृप्ती बोराडे करीत आहेत.Comments

Popular posts from this blog