रायगड जिल्हास्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद संपन्न!
नागोठणे (टिळक खाडे) भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद या वैज्ञानिक उपक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा , त्यांच्यामध्ये संशोधक वृत्ती वाढीस लागावी , त्यांना सर्वेक्षण पद्धतीचे आकलन होऊन त्यांच्यामध्ये जिज्ञासा , निरिक्षण, तर्कसंगत विचार हे गुण वृद्धींगत व्हावेत ह्या उद्देशाने ह्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन केले जाते . ' शाश्वत विकासासाठी सामाजिक नाविन्य ' हा यावर्षीच्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचा मुख्य विषय आहे. रायगड जिल्ह्यातील विविध शाळांतील ३०० विद्यार्थ्यांनी ह्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी आपल्या प्रकल्पांची नोंदणी केली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ह्यातील निवडक ८० प्रकल्पांचे दिनांक १८ व १९ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय ऑनलाईन सादरीकरण झाले . या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नवी मुंबई येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम या संस्थेतील वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ.प्रवीण गवळी , ठाणे येथील जिज्ञासा ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे , राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे राज्य समन्वयक विश्वास कोरडे , राज्य शैक्षणिक समन्वयक नंदकुमार कासार , रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील विज्ञान पर्यवेक्षिका सविता माळी , रिना पाटील , जिल्हा समन्वयक अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यातून १७ विद्यार्थ्यांचे प्रकल्प विभागीय व राज्यस्तरीय बालविज्ञान परिषदेसाठी निवडले गेले . हे विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत. केतकी गांगरे , सुमेध देशपांडे , समृद्धी मोरे , जय नायडू , निकुंज चौबे ( पनवेल तालुका ) , अक्षरा ठाकूर , व्ही . एम्. श्रीलक्ष्मी ( उरण तालुका ) , कुणाल घारगे , श्रेया मांडवकर ( कर्जत तालुका ) , जानवी ठाकूर ( अलिबाग तालुका ), श्रीजीत कार्ले ( रोहा तालुका ) , पार्थ जोशी ( माणगाव तालुका ) , प्रितीश खंडेलवाल , धृवी मोकल ( मुरुड तालुका ) , अफझिया कालसेकर , आयेशा खातिब , समराह धनसे ( महाड तालुका ) या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा को. ए. सो.चे वि. खं .विद्यालय पनवेल येथे रविवार दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी संपन्न झाला . या कार्यक्रमात तज्ज्ञ परीक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विशेष मार्गदर्शन केले .रायगड जिल्हास्तरीय बाल विज्ञान परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विज्ञान शिक्षक टिळक खाडे , अनिल गलगले , नरेंद्र जाधव , निलेश म्हात्रे , संतोष जाधव, उदय पाटील, भरत जोशी , ज्ञानदेव बिचकर , विक्रम काटकर , शशिकांत सरकटे , मीना मोरे या तालुका प्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले. ह्या रायगड जिल्हास्तरीय बाल विज्ञान परिषदेसाठी रायगड जिल्हा परिषद ( शिक्षण विभाग ) व रायगड जिल्हा गणित व विज्ञान अध्यापक मंडळ यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले .
Comments
Post a Comment