गरिबांची लालपरी संपानंतर रोहा आगारातून अखेर धावली सामान्य प्रवाशांत समाधान!

कोलाड ( श्याम लोखंडे)एस .टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे ही कामगारांची प्रमुख मागणी व इतर मागण्यांसाठी दि. 8 नोव्हेंबरपासून एस. टी. कर्मचाऱ्यांनी संपाच्या माध्यमातून आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचा तोडगा निघाला नसला तरी शासनाने केलेल्या आव्हानाला काही कर्मचारी वर्ग यांनी प्रतिसाद देत 

रोहा आगारातून शुक्रवार दि. 26 नोव्हे.रोजी सकाळी 11 वा.पासून रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात लालपरी एस.टी. सेवा सुरु करण्यात आली असल्याची माहिती आगार प्रमुख सोनाली कांबळे यांनी दिली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात एस.टी सेवा सुरु झाल्याने समान्य प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.रोहा आगारात एकुण 244 कर्मचारी असून त्यातील आतापर्यंत 25 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. शुक्रवारपासून रोहा तालुक्यातील विरझोली , नागोठणे, चणेरा, कोलाड अशा फ़ेऱ्यांना सुरुवात झाली असून एस.टीच्या सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत एकून 56 फ़ेऱ्या झाल्या आहेत. सदर एस.टी.वाहतूक सेवारोहा आगारप्रमुख सोनाली कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आली आहे. 

जे कामावर आले त्यांना कामावर रुजू करण्यात आले असल्याची माहितीही कांबळे यांनी देत तसेच एस. टी. वाहतूक सेवेचा लाभ पूर्वीसारखे सर्व प्रवाशांनी घ्यावे असे आवाहनही प्रसंगी आगार प्रमुख कांबळे यांनी केले आहे. दरम्यान, ऐन दिवाळी सणात एस.टी कर्मचाऱ्यांनी संपाच्या माध्यमातून पुकारलेल्या आंदोलनामुळे सामान्य नागरिकांना खाजगी वाहतूक सेवेचा वापर करावे लागले. ज्यामुळे प्रवाशांना नाहक अतिरिक्त भार व त्यांच्या खिशाला कात्रण सोसावे लागले. आता पुन्हा गरिबांची लालपरी एस.टी सेवा सुरु झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त करत सुटकेचा निस्वास सोडला आहे.

Comments

Popular posts from this blog