रोहा पंचायत समितीचा कारभार आहे तरी कसा?
भ्रष्टाचार ग्रामपंचायतींवर कारवाई सोडाच, मात्र चौकशी देखील होत नसल्याने संताप!
कुंपण तर शेत खात नाही ना? जनतेत चर्चा......
कोलाड ( श्याम लोखंडे )रोहा तालुक्यात कोरोना काळात अनेक ग्राम पंचायत मध्ये झालेले भ्रष्टाचार आता सर्व सामान्य जनतेसमोर उघड होत चालले आहेत मात्र त्यावर काम करणारी प्रशाकीय यंत्रणा मात्र डोळेझाक करत असल्याने कारवाही सोडाच मात्र त्यावर साधी चौकशी करण्यास टाळाटाळ त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे ,
रोहा तालुक्यातील श्रीमंत समजली जाणारी ऐनघर ग्राम पंचायत पाठोपाठ आता पुन्हा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी,भातसई, तांबडी सह काही ग्राम पंचायतीत अनागोंदी कारभारातून गैर व्यवहार झाले आहेत त्यामुळे हे निदर्शनात येताच स्थानिक काही ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी या बाबत वेळोवेळी संबंधित अधिकारी वर्गांकडे याच्या लेखी तक्रारी करून देखील त्यावर कारवाही सोडाच मात्र साधी त्याची चौकशी देखील करण्यास टाळाटाळ करत असल्याने सर्व सामान्य जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.
""" सरकारी काम आणि बारा महिने थांब, ही म्हण त्यामुळे रोहा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा अंधःधुंदी कारभार अधिक प्रमाणात वाढत असल्याने तालुक्यातील ग्राम पंचायत मध्ये चालणारे भ्रष्ट कारभार यावर नियंत्रण कोणाचे तर होत असलेल्या ग्राम पंचायतमधील अनागोंदी कारभाराला नक्की जबादर तरी कोण? गाव विकासासाठी येणाऱ्या निधीचा परस्पर गैरवापर केला गेला अथवा होत असल्याने कोण कोणाला पाठीशी घालतो देशात अनेक कायदे केले आहेत परंतु ते किती आमलात आणले जातात यावर आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे .त्यामुळे पुढारी भ्रष्ट की अधिकारी भ्रष्ट असा संतप्त सवाल उठत असून महिनो महिनो चौकशी सुरूच त्याचे फलित काय तर याचे उत्तर काय तर कधी चौकशी अधिकारी रजेवर तर कधी कार्यरत असलेले ग्राम सेवक अधिकारी गैर हजर त्यामुळे कारवाही दूर तर साधी चौकशी देखील लांबणीवर त्यामुळे भ्रष्ट कारभारी वाऱ्यावरच पैशाचा भ्रष्टाचार व करप्शन होऊ नये म्हणून मोदी सरकारने अनेक कडक कायदे या देशात आमलात आणले आहेत मात्र त्या कायद्याची अमलबजावणी कोण करणार अमलबजावणी करणारेच अधिकारी भ्रष्ट आहेत का असा सवाल उठला आहे त्यामुळे तालुक्यातील भ्रष्टाचारी ग्राम पंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्यास विलंब का ती करण्यास अधिकारी वर्ग का टाळाटाळ करतात यात नक्की दडलंय काय काही ग्राम पंचायत मध्ये थेट कारभार असल्याने कोणतीही शासकिय परवानगी न घेता केला जातो कारभार त्यात मोठा अनागोंदी याला जबाबदार कोण स्थानिक पातळीवरील नागरिकांनी अनेकदा या बाबत तक्रारी करून देखील कारवाही सोडाच अद्याप चौकशी देखील नाही चौकशी लांबणीवर ढकलण्याचे नेमके कारण काय असा संमिश्र प्रश्न रोहा तालुक्यातील जनमानसाला पडला आहे .
Comments
Post a Comment