शिक्षिका श्रीमती वरूणाक्षी भारती आंद्रे यांना शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांच्या हस्ते महाशिक्षक पुरस्कार प्रदान

              गोवे-कोलाड (विश्वास निकम ) पालघर जिल्हा परिषदेच्या आगवन शिशुपाडा शाळेतील सौ.वरूणाक्षी भारत आंद्रे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते महाशिक्षक अॕवाॕर्ड नरिमन पाॕईंट मुंबई येथे प्रदान करण्यात आला.

    सी. आर. दळवी (I)आय फाउंडेशन नवी मुंबई महाराष्ट्र च्या वतीने हा पुरस्कार त्यांचे कोविड लाॕकडाऊन दरम्यान शैक्षणिक व सामाजिक उल्लेखनीय कामाच्या निवडीबद्दल देण्यात आला. लाॕकडाऊन काळात अनेक नाविण्यपुर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांचे अध्यापन निरंतर चालू ठेवले,अनेक सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य मिळवून दिले तसेच लाॕकडाऊन मध्ये 

त्यांनी केलेल्या 'स्मार्ट पाटी' ह्या नवोपक्रमाला राज्यभर उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे .आंद्रे यांना आता पर्यंत राष्ट्रीय ,राज्यस्तरिय,जिल्हा स्तरिय असे एकूण पाच नवोपक्रमशील पुरस्कार मिळाले आहेत. महाशिक्षक पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, Samsung टॕब असे आहे. यावेळी रणजितसिंह दिसले.जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते, डॉ. राधाकृष्ण पिल्लई संचालक मुंबई विद्यापीठ ,श्री.प्रमोद शिंदे ट्रस्टी मनशक्ती केंद्र,आशिष झालानी अध्यक्ष (अंतरराष्ट्रीय मार्केट) स्क्वेअर पांडा इंक U.S.A. आदी मान्यवर उपस्थित होते

          या पुरस्काराबद्दल जिल्हा परिषद पालघर पंचायत समिती डहाणू अधिकारी व पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मित्रपरिवार विद्यार्थीपरिवार यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले आहे.  

Comments

Popular posts from this blog