जय शिवराय क्रिकेट चषकाचे मानकरी लक्ष्मीनगर   

      गोवे-कोलाड (विश्वास निकम )रोहा तालुक्यातील जय शिवराय क्रिकेट असोशियन च्या वतीने लक्ष्मीनगर येथे आयोजित मर्यादित क्रिकेट सामन्यात जय शिवराय चषक प्रथम क्रमांक लक्ष्मीनगर या संघाने पटकावला आहे. विजेते संघाला रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे.

या स्पर्धेला आमदार अनिकेत तटकरे यांनी भेट दिली असून विजेते संघाला राष्ट्रवादी अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, शेणवई सरपंच प्रगती देशमुख, उद्योजक संतोष भोईर, महादेव सरसंबे,परेश म्हात्रे, चंद्रकांत चौलकर, दत्ता चावरेकर, संजय दाभाडे, मंगेश दाभाडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले असून यावेळी अंकुश ताडकर, रमाकांत चौलकर, गणेश चावरेकर, दत्ता वाघमारे, मनोज मोरे, भूषण टक्के, विवेक चावरेकर, प्रवीण दाभाडे आदी उपस्थित होते

या स्पर्धेत द्वितीय क्रमांक सानेगाव, तृतीय क्रमांक शेणवई, चतुर्थ क्रमांक यशवंतखार, उत्कृष्ट गोलंदाज निषेध दाभाडे, उत्कृष्ट फलंदाज सागर भोस्तेकर मालिकावीर स्मितेज दाभाडे यांना देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog