संजय थळे यांना वसंत स्मृती पुरस्कार प्रदान, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव,
गोवे-कोलाड (विश्वास निकम )भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभाग यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा स्वर्गीय वसंत डावखरे यांच्या स्मरणार्थ वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार श्री. संजय थळे प्राथमिक शाळा अडुळसे यांना सम्मान पूर्वक प्रदान करण्यात आला.
रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयांतील शिक्षकांची ऑफलाईन पद्धतीने या पुरस्कारासाठी माहिती मागविण्यात आली होती.
संजय थळे यांनी आजतगायत आपल्या शाळेत अनेक शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास केला आहे. त्यांच्या उपक्रमांची दखल अनेक संस्थांनी घेवून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित ही केले आहे. वसंत स्मृती पुरस्कार खासदार श्री. कपिल पाटील, आमदार संजय केळकर, आमदार श्री. विनय नातू, मा. आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते अनेक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान कण्यात आला.त्यांच्या या यशात अडुळसे ग्रामस्थ त्याचप्रमाणे गटशिक्षणाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी आदींचा मोलाचा वाटा असल्याचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. संजय थळे यांनी सांगितले त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्या मित्र परिवाराने, ग्रामस्थांनी विशेष कौतूक केले.
Comments
Post a Comment