श्रीगुरु गोपाळबाबा वाजे अलिबागकर महाराज यांचा २९वा पुण्यस्मरण सोहळा,

     गोवे-कोलाड (विश्वास निकम)

            श्री सद्गुरू गणपतबाबा अलिबागकर महाराज यांच्या फडाचे वंशज वै. श्री. गुरु गोपाळबाबा वाजे अलिबागकर महाराज यांचा एकोणतीसावा (२९) वा.पुण्यस्मरण मिती कार्तिक वद्य ४ शके १९४३मंगळवार दि.२३/११/२०२१ रोजी श्री. अलिबागकर महाराज मठ, कासार घाट श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संपन्न होणार आहे.

               या कार्यक्रम मिती कार्तिक वद्य १शके १९४३ शनिवार दि.२०/११/२१ते कार्तिक वद्य ५बुधवार दि.२४/११/२१पर्यंत साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमानिमित्ताने दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ४ते ६श्रींची काकड आरती भजन, सकाळी ६.३० ते ८.३०नित्यपूजा,९ते १२.३० श्री. तुकोबाराय गाथा भजन, दुपारी १ते ४भोजन, सांय.४ते ५ प्रवचन,५ते ६.३०हरिपाठ,७ते ९ हरिकीर्तन, नंतर जागरण होईल.

                   तसेच मिती कार्तिक वद्य ४शके १९४३मंगळवार दि.२३/११/२१रोजी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने श्रीची महापूजा अभिषेक, सकाळी ८ते १० दिंडी प्रदक्षिणा १०.३०ते १२.३० पुण्यस्मरणा निमित्ताने किर्तन,दुपारी महाप्रसाद, मिती कार्तिक वद्य ५शके १९४३बुधवार दि.२४/११/२१ रोजी सकाळी १०ते १२काल्याचे किर्तन, तसेच मिती कार्तिक वद्य ६शके १९४३गुरुवार दि.२५/११/२१ रोजी वै. ह.भ.प.सौ. मीनाताई नारायण वाजे अलिबाकर महाराज यांच्या २७ व्या. पुण्यस्मरणा निमित्ताने १०ते १२ भजन नंतर महाप्रसाद तरी भाविकांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती ह.भ.प. नारायणदादा वाजे अलिबागकर महाराज यांच्याकडून करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog