जनावरांची योग्य काळजी न घेतल्याने दोन गाई मृत्युमुखी, गुन्हा दाखल, 

  कोलाड पोलीसांचे शेतकरीवर्ग व प्राणी मित्रांकडून अभिनंदन

    रायगड (भिवा पवार )एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तर पोलिसांकडे दाद मागता येते, न्यायालयात दाद मागता येते.  पण मुक्या प्राण्यांवर अन्याय झाला त्यांना निर्दयतेने वागविले त्यांची योग्य ती काळजी घेतली नाही,  तर त्यांनी दाद कोणाकडे मागायची.  पण मुक्या प्राण्यांवर अन्याय तर त्यांना न्याय देता येतो हे दाखवून दिले आहे रोहा तालुक्यातील कोलाड  पोलिस स्टेशन मधील कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष सहाय्य्क  पोलीस निरीक्षक सुभाष जाधव  व त्यांच्या पथकाने काल 8 ऑक्टोंबर रोजी गुरांना घेऊन जात  असताना चालकाकडे वाहतूक परवाना, पशुवैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, चेक रिपोर्ट, असूनही  गुरांची योग्य ती काळजी न घेणार्‍या व  गाईंच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी विरोधात कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत संपूर्ण रायगड जिल्ह्यात शेतकरीवर्ग  व प्राणिप्रेमींनकडून कोलाड पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

                        (संग्रहीत छायाचित्र )

याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 8 ऑक्टोबर 2021रोजी आरोपी अब्दुल कादिर शफीउल्ला मान्सूरी  वय 32 राहणार वसई फाटा  मिल्लत नगर जिल्हा ठाणे यांनी आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो क्रमांक MH02 FG 1842हा 

 गिर  जातीच्या 5गायी व 3 बछडे असे आठ जनावरे पालवणी मंडणगड ते वासॊना गुजरात असे  घेऊन जात असताना कोलाड  पोलिसांनी पूगाव  गावच्या हद्दीत तपासणी केली असता यामध्ये दोन गाई मरण पावलेल्या स्थितीत आढळून आल्यास  गुरांची योग्य ती काळजी न घेतल्याने त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झालेले सदर व्यक्तीवर कोलाड पोलीस ठाण्यात पोस्टे गुर नं.085/2021 प्राण्यांना निर्दयतेने वागणूक करण्यास  प्रतिबंध अधिनियम 1960 कलम 11 मोवा कायदा 1988 कलम 66 /192 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर टेम्पो तील असलेले 6 गिर गाई पहूर येथील डॉक्टर भट यांच्या गोशाळेत संरक्षण कमी देण्यात आले असून मृत पावलेल्या गाईंचे पशुवैद्यकीय अधिकारी रोहा  यांच्याकडून पोस्टमॉर्टम करण्यात आलेले आहे अधिक तपास कोलाड  पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार ए.आर. सायगावकर,पोहवा. नरेश पाटील पोहवा. ए.आर. म्हात्रे, अधिक तपास करत आहेत मात्र कोलाड पोलिसांच्या  या  कामगिरीबाबत शेतकरीवर्गात तसेच  प्राणिप्रेमींन कडून कोलाड पोलीसांचे  अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog