चिंचवली तर्फे दिवाळी येथील भवानी मातेच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ
गोवे- कोलाड (विश्वास निकम)
रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे दिवाळी येथील गुरुवार दि.७ ऑक्टोबर २०२१ रोजी भवानी मातेचे पूजन करुन नवरात्र उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.चिंचवली तर्फे दिवाळी येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असणारी भवानी मातेच्या घटस्थापणेसाठी गावातील वयोवृद्ध ग्रामस्थ, तरुण तरुणी व महिला वर्ग उपस्थित राहुन अनेक वर्षांपासून भवानी मातेचा नवरात्र उत्सव मोठया उत्साही वातावरणात साजरा केला जातो.
परंतु गेली दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या महामारीमुळे सर्व सार्वजनिक, धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमावर निर्बंध घालण्यात आले आहेत.तरी सोशल डिस्टनचा पालन करीत चिंचवली तर्फे दिवाळी येथील महिलांनी उपस्थित राहुन भवानी मातेचे दर्शन घेतले यावेळी प्रगती येरुणकर, सायली सावळे,सान्वी विचारे,सिद्धी येरुणकर, शुभांगी मालुसरे, अर्चना येरुणकर, सुजाता येरुणकर, रतिका येरुणकर,तसेच गावातील सर्व महिला तसेच तरुण,तरुणी, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहुन भवानी मातेचे दर्शन घेतले.
Comments
Post a Comment